Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत ‘सॉफ्ट पॉवर’ने करणार जगाला आकर्षित; शंभर देशांसोबत होणार सांस्कृतिक करार

येत्या काही वर्षात भारत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. याच दरम्यान भारत आता सांस्कृतिक 'सॉफ्ट पॉवर'ने जगाला आकर्षित करणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 01, 2024 | 03:16 PM
भारत 'सॉफ्ट पॉवर'ने करणार जगाला आकर्षित; शंभर देशांसोबत होणार सांस्कृतिक करार

भारत 'सॉफ्ट पॉवर'ने करणार जगाला आकर्षित; शंभर देशांसोबत होणार सांस्कृतिक करार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: येत्या काही वर्षात भारत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. याच दरम्यान भारत आता सांस्कृतिक ‘सॉफ्ट पॉवर’ने जगाला आकर्षित करणार आहे. सध्या याची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. बारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने स्षष्ट केले आहे की, भारत विविध देशांशी सांस्कृतिक करार करुन संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलत आहे. यामुळे भारताचा विकासात वाढ होण्याची शक्यता आहे.

या उपक्रमांतकर्गत भारत विविध देशांमध्ये सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणार

मिळालेल्या माहितीनुसरा, भारताचे सध्या एकूण 84 देशांसोबत सांस्कृतिक करार आहे. मात्र 2025 मध्ये भारत 100 देशांपर्यंत हा करार करणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे. या उपक्रमांतकर्गत भारत विविध देशांमध्ये सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणार आहे.

यामध्ये आपले नृत्य, संगीत, नाट्यगृहे, संग्रहालये, ग्रंथालये यांची ओळख जगाला करून देण्यात येणार आहे. भारताना आत्तापर्यंत 59 देशांमध्ये 62 भारत सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले आहे. यामुळे भारताची सांस्कृतिक शक्ती जगभरात पोहोचत आहे.

हे देखील वाचा- Pakistan News: पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान हिंसाचारात दोषी; न्यायालकडून ठोस पुरावे सादर

पर्यटन आणि इतर काही क्षेत्रांना चालना

सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधात इतर देशांशी चर्चा सुर करण्यात आली आहे. यामुळे 2025 वर्ष भारतासाठी अधिक प्रगत असू शकते. या करारामुळे भारताच्या पर्यटनाल चालना मिळेल. एढेच नाही कर, आरोग्य, शिक्षण, वाणिज्य यांसारख्या क्षेत्रांनाही यामुळे चालना मिळेल.

दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे भारताला इतर देशांच्या उत्तम पद्धती शिकता येतील. विशेषतः संग्रहालये, अभिलेखागारे आणि पुरातत्व स्थळांचे संवर्धन करण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. जगभरातील लोक सध्या बारतीय संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

भारताची नवीन विचारसरणी जगासमोर

या करारामुळे भारताची नवीन विचारसरणी जगासमोर येईल. तसेच कोरोनाच्या काळात भारताने जागतिक समुदायाला मदत करून आपली सकारात्मक प्रतिमा निर्माण केली होती. आता सांस्कृतिक ‘सॉफ्ट पॉवर’च्या माध्यमातून भारत जागतिक मंचावर नवी ओळख निर्माण करू पाहत आहे. ब्रिटनसारख्या देशांमध्ये रोड शो आयोजित करून भारताने आधीच या मोहिमेचा प्रारंभ केला आहे.

भारतातील विविधता, कला आणि संस्कृती यांची श्रीमंती जगभरातील देशांना आकर्षित करत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने आखलेल्या या योजनांमुळे भारताची जागतिक प्रभावशक्ती अधिक दृढ होईल, तसेच भारत जगातील देशांसाठी प्रेरणादायक ठरेल.

या देशांसोबत आहे भारताचे सांस्कृतिक करार

भारताचे आत्तापर्यंत एकूण 84 देशांशी सांस्कृतिक करार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कंबोडिया, चीन, कोलंबिया, इजिप्त, फ्रान्स, बांगलादेश, कॅनडा, इटली, केनिया, मलेशिया, मालदीव, नॉर्वे, माली, मॉरिशस, रशिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, सौदी अरेबिया, युनायटेड किंगडम, यूएई, झिम्बाब्वे, युक्रेन यांचा समावोश आहे.

हे देखील वाचा- Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचारात वकिलाच्या हत्येप्रकरणी 9 जणांना अटक; हिंदूंवर हल्ले सुरुच

Web Title: India will attract tourist from world by cultural soft power nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • india
  • Indian culture

संबंधित बातम्या

‘माउंटेन मॅन’ दशरथ मांझी! केवळ छिन्नी-हातोड्याच्या बळावर २२ वर्षांत डोंगर फोडून रस्ता करणारा महामानव
1

‘माउंटेन मॅन’ दशरथ मांझी! केवळ छिन्नी-हातोड्याच्या बळावर २२ वर्षांत डोंगर फोडून रस्ता करणारा महामानव

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
2

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?
3

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”
4

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.