Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: सीमारेषेजवळ उडाले ‘राफेल’ जेट्स! पहलगाम हल्ल्याच्या बदल्यासाठी ‘मिशन आक्रमण’?

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. पर्यटकांवर त्यांनी क्रूर हल्ला केला. यामध्ये 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2025 | 01:01 AM
Pahalgam Terror Attack: सीमारेषेजवळ उडाले ‘राफेल’ जेट्स! पहलगाम हल्ल्याच्या बदल्यासाठी ‘मिशन आक्रमण’?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. पर्यटकांवर त्यांनी क्रूर हल्ला केला. यामध्ये 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. तर काल सर्व पक्षांची एक बैठक देखील सरकारने घेतली आहे. मात्र आता भारतीय वायुसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेली आहे. भारतीय वायुसेनेने ‘आक्रमण’ ऑपरेशन ड्रिल केले आहे.

‘आक्रमण’ ड्रिलमध्ये भारतीय वायुसेनेच्या सर्वात अत्याधुनिक अशा राफेल जेट्सच्या नेतृत्वात आघाडीच्या लढाऊ ताफ्याचे प्रदर्शन करण्यात आले. भारतीय हवाई दलाकडे हरियाणातील अंबाला आणि पश्चिम बंगालमधील हशिमारा येथे दोन राफेल स्क्वॉड्रन तैनात आहेत. ही अत्याधुनिक विमाने सध्या सुरू असलेल्या सरावाच्या केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळाले.

सुरक्षा विभागाशी संबंधित सूत्रांनी एका वृत्तवाहिणीशी संवाद साधतान याबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय वायुसेनेने आपली अनेक संसाधने सेंट्रल सेक्टरमध्ये नेण्यात आली आहेत. भारतीय वायुसेना सपाट आणि डोंगराळ प्रदेशासह विविध परिस्थितींमध्ये सराव करत आहे. हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि रॅम्पेज आणि रॉक्स सारख्या लांब पल्ल्याच्या अचूक स्ट्राइक सिस्टीमसह  भारतीय वायुसेनेने दक्षिण आशियाई प्रदेशात आपली ताकद वाढवली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा ‘आक्रमण’ सराव होत असल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या हवाई हल्ल्यात भारतीय वायुसेनेने क्षमता दाखवली होती. पाकिस्तानमध्ये घुसून अचूक हल्ले करण्यासाठी  मिराज २००० जेट विमाने वापरण्यात आली होती. आता राफेल जेट्सच्या समावेशामुळे भारतीय वायुसेनेची ताकद अधिक वाढली आहे. भारतीय हवाई दलाने S-400 हवाई संरक्षण प्रणालीसारखे नवीन फोर्स मल्टीप्लायर्स देखील आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत , जे शत्रूच्या हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत.

सिंधु जल करारा’ला स्थगिती देताच भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना ठार मारण्यात आले. या हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान भारताने आता पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक, ओद्योगीक कोंडी होणार आहे.

Pahalgam Terror Attack: ‘सिंधु जल करारा’ला स्थगिती देताच भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये; ‘चिनाब’चे पाणी रोखले

भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. चिनाब नदीवरील असणाऱ्या धरणातून पाकिस्तानला पाणीपुरवठा होत असते. भारताने  चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला एक थेंब देखील पाणी भारताकडून मिळणार नाहीये. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

 

Web Title: Indian airforce started drill exercise with rafale and sukhoi fighter jest near loc mission akraman after pahalgam terrorist attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 01:01 AM

Topics:  

  • Indian Air Force
  • Modi government
  • Pahalgam Terror Attack
  • Terrorist Activities

संबंधित बातम्या

PM Narendra Modi security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल; ‘हे’ आयपीएस ऑफिसर सांभाळणार त्यांच्या सुरक्षेची धुरा!
1

PM Narendra Modi security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल; ‘हे’ आयपीएस ऑफिसर सांभाळणार त्यांच्या सुरक्षेची धुरा!

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral
2

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral

Operation Sindoor Martyrs: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ६ शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; देशासाठी सर्वोच्च बलिदान
3

Operation Sindoor Martyrs: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ६ शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; देशासाठी सर्वोच्च बलिदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.