भारताने रोखले पाकिस्तानचे पाणी (फोटो- - ANI)
श्रीनगर: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकारने काही महत्वाची पावले उचलली आहे. भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. वाघा बॉर्डर बंद केली आहे. तर पाकिस्तानने देखील भारताच्या निर्णयांची कॉपी केल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. आज भारताने चिनाब नदीचे पाणी रोखले आहे.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना ठार मारण्यात आले. या हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान भारताने आता पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक, ओद्योगीक कोंडी होणार आहे.
Locals, tourists welcome Centre's move to suspend Indus Waters Treaty, call for stricter action against Pakistan
Read @ANI Story | https://t.co/qV42Im1AKX#Locals #Tourists #Centre #IndusWatersTreaty #Pakistan #PahalgamTerrorAttack pic.twitter.com/QdqCsy7TQm
— ANI Digital (@ani_digital) April 24, 2025
भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. चिनाब नदीवरील असणाऱ्या धरणातून पाकिस्तानला पाणीपुरवठा होत असते. भारताने चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला एक थेंब देखील पाणी भारताकडून मिळणार नाहीये. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
नाक दाबताच पाकिस्तान बरळला
भारताने काही महत्वाची पावले उचलल्यानंतर आज पाकिस्तान सरकारने देखील महत्वाची बैठक घेतली. भारतासाठी पाकिस्तानने हवाई बंदी केली आहे. व्यापार बंद केला आहे. आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते आहे. पाकिस्तानी पीएमओच्या निवेदनात सांगण्यात आले की, पाकिस्तान भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याच्या अधिकाराचा वापर करेल. ज्यामध्ये शिमला कराराचा समावेश आहे. पाकिस्तानने भारतावर पाकिस्तानात दहशतवाद पसरवण्याचा आरोप केला.
Pahalgam Terror Attack: ‘सिंधु जल करारा’चे उल्लंघन म्हणजे युद्धाची घोषणा; नाक दाबताच पाकिस्तान बरळला
सिंधु जल करार तोडणे म्हणजे युद्धाची घोषणा
सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या घोषणेला पाकिस्तान पूर्णपणे नकार देतो. पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की हा करार एक बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार आहे, ज्यामध्ये एकतर्फी स्थगिती आणण्याची कोणतीही तरतूद नाही. सिंधू जल करारांतर्गत पाण्याचा प्रवाह रोखण्याचा किंवा वळवण्याचा प्रकार म्हणजेच पाकिस्तानच्या हक्कांचे उल्लंघन करण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असा इशारा पाकिस्तानने भारताला दिला आहे.