Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Naxalites Killed: 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान; देशातून नक्षलवाद उखडून टाकण्यासाठी अमित शाहांचा ‘हा’ मास्टरप्लॅन

गेल्या वर्षभरात आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होत आहे. गेल्या काही महिन्यांत सुरक्षा यंत्रणेला नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठे यश प्राप्त झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2025 | 04:25 PM
Chhattisgarh Naxalites Killed: 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान; देशातून नक्षलवाद उखडून टाकण्यासाठी अमित शाहांचा ‘हा’ मास्टरप्लॅन
Follow Us
Close
Follow Us:

रायपूर: गेल्या वर्षभरात आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होत आहे. गेल्या काही महिन्यांत सुरक्षा यंत्रणेला नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठे यश प्राप्त झाले आहे. आज देखील सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने नक्षलवाद मूळापासून नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड हेच सरकारचे लक्ष्य आहे. आज सुरक्षा दलांनी 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. या भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत 2 जवान शहीद झाले आहेत. तर अन्य 2 जवान जखमी झाले. आतापर्यंतचे सुरक्षा दलांचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी या चकमकीची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात कारवाई केली गेली तर केंद्र सरकारचे हे लक्ष्य यशस्वी होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात भीषण धुमश्चक्री गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.  31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपूर्ण देशातून संपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने ठेवला आहे. त्यासाठी सुरक्षा दलांना कारवाईसाठी मोकळीक देण्यात आली आहे.

हेही वाचा: Chhattisgarh Naxal killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; १२ नक्षलवादी ठार

IED स्फोटात 9 जवान शहीद

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता, सुरक्षा दलाचे वाहन त्याच्या प्रभावाखाली आले. IED स्फोटात 9 जवान शहीद झाले आहेत. 6 हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांचे पथक ऑपरेशन करून परतत होते.

दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन दल ऑपरेशननंतर परतत असताना नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर हा हल्ला केला. दुपारी 2:15 वाजता, नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. विजापूरमधील या हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. सोमवारी कुत्रू भागात नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या चिलखती वाहनाला लक्ष्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनावर आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जवान शहीद झाले आहेत. इतर अनेक जवानही गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. बस्तर रेंजच्या आयजींनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: Breaking: विजापूरमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, IED स्फोटात 9 जवान शहीद, अनेक गंभीर जखमी

आयजी बस्तर यांचे वक्तव्य

आयजी बस्तर पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये आयईडी स्फोटाने सुरक्षा दलांची वाहने उडवून दिली. या हल्ल्यात आठ डीआरजी जवान आणि दंतेवाडातील एका चालकासह नऊ जवान शहीद झाले. सुरक्षा दल दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथे संयुक्त कारवाई करून परतत होते. दंतेवाडा, विजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. यामध्ये ५ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून आमचा एक जवान शहीद झाला आहे. त्यानंतर आमची टीम परतत असताना विजापूरच्या आंबेली भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पेरली होती, त्यामुळे आमच्या सुरक्षा दलाच्या वाहनाला धडक बसली. यामध्ये 8 जवान आणि एक चालक शहीद झाला.

 

Web Title: Indian armed forces killed 31 naxalites bijapur district chhattisgarh amit shaha resolution fulfilled before 2026 latest news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • CRPF
  • Naxal attack

संबंधित बातम्या

Big Breaking: नक्षल्यांनो खबरदार! विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; शूर जवानांनी थेट..
1

Big Breaking: नक्षल्यांनो खबरदार! विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; शूर जवानांनी थेट..

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर
2

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…
3

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान
4

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.