जंगलात गोळीबाराचा थरार; पोलिसांच्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांचा खात्मा
रायपूर : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवादींमध्ये चकमक झाली आहे. या झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी या चकमकीची माहिती दिली आहे. त्याच वेळी, ३-४ सैनिक जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. ही चकमक विजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली. सैनिक नक्षलवाद्यांचा सतत शोध मोहीम सुरू ठेवत आहेत.
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये ही चकमक झाली. सुरक्षा दलाने विजापूरमध्ये मोठी कारवाई केली. गंगाहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोडका भागात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमधये ही चकमक झाली. यावेळी जोरदार गोळीबार देखील झाला. या चकमकीत आतापर्यंत 12 नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. या कारवाईमध्ये दोन जवान शहीद झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नक्षलविरोधी मोहिमेत जवान व नक्षलवाद्यांमध्ये अनेकदा चकमकी होत आहेत. सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तोडका परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती. यामध्ये नक्षलवाद्यांच्या खातमा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत शहीद झालेले जवान डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि स्पेशल टास्क फोर्स (STF)चे होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अपडेट घ्या एका क्लिकवर
मीडिया रिपोर्टनुसार, माओवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतररित होत आहेत. तसेच बॉर्डरवर दबून राहत आहेत आणि अंतर्गत भागात बैठकाही घेत आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी विजापूर जिल्ह्यात कारवाई सुरू केली. यात त्यांची माओवाद्यांशी चकमक झाली. मृत नक्षलवाद्यांची संख्याही वाढू शकते. मारल्या गेलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत, तीन जिल्ह्यांच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत नक्षलवाद्यांना घेरल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफचे जवान सहभागी झाले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांनी शस्त्रेही जप्त केली आहेत. बस्तरमधून नक्षलवाद संपवण्यासाठी मार्च २०२६ पर्यंत कालावधी ठरवण्यात आला आहे. कारण माओवाद्यांनी आययडीने केलेल्या स्फोटात जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) आठ जवान आणि एका चालकाचा मृत्यू झाला होता. यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.