Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu Kashmir: भारतीय लष्करानं संपूर्ण जंगल वेढलं; एका दहशतवाद्याला यमसदनी धाडलं अन्…

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या कठूआ परिसरात भारतीय सैन्य दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. दरम्यान या भागात भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन राबवले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2025 | 04:22 PM
Jammu Kashmir: भारतीय लष्करानं संपूर्ण जंगल वेढलं; एका दहशतवाद्याला यमसदनी धाडलं अन्…
Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर: गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या कठूआ परिसरात भारतीय सैन्य दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. दरम्यान या भागात भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन राबवले आहे. संपूर्ण परिसराला लष्कराने वेढा घातला आहे. यावेळी सैन्य दलाने एका दहशतवाद्याला घेरले होते. त्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

अजूनही काही दहशतवादी या परिसरात लपले असल्याची शक्यता आहे. लष्कर सर्च ऑपरेशन राबवत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून दहशतवादी आणि लष्कर यांच्यात चकमक सुरू आहे. त्यात एक दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे. या सर्च ऑपरेशनमध्ये काश्मीर पोलिस, एनएसजी सीआरपीएफ आणि बीएसएफने सहभाग घेतला आहे. यासाठी अन्य टीमची देखील मदत घेतली जात आहे, या परिसरात नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर-दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक

कठूआ भागात 4 ते 5 दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. या परिसरात सैन्य दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. लष्कराने या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. दरम्यान सर्च ऑपरेशन राबवले जात असताना दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. यामध्ये भारतीय लष्कराचे 2 जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे.

जम्मूच्या राजौरीमध्ये सैन्याच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

शेजारील राष्ट्र पाकिस्तान कायमच भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र भारतीय लष्कर अशा नापाक कारवायांना सडेतोड उत्तर देत असते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. मात्र याच दरम्यान काही महत्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या आखनूर सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या भागात काही दशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानुसार हे सर्च ऑपरेशन केले जात आहे.

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर-दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक; 2 जवान जखमी

नियंत्रण रेषेजवळ काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली. त्यानंतर लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच जोगीवन वनक्षेत्रात संशयास्पद हालचाली देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे भट्टल परिसरात लष्कराच्या अनेक तुकड्या शोध मोहीम राबवत आहे. या भागात काही दहशतवादी घुसल्याचा संशय भारतीय लष्कराला आहे.

शोधमोहीम अधिक वेगाने सुरू

भारतीय लष्कर या भागात अत्यंत वेगाने आणि सावधगिरीने शोध मोहीम राबवत आहे. त्यामुळे या परीसरासह संवेनदशील भागात भारतीय लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्यातरी कोणतीही संशयास्पद कृती लष्कराला आढळून आलेली नाही. मात्र सतर्कता पूर्ण बाळगली जात आहे. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. मागील वर्षी याच परिसरात लष्कराने दोन ते तीन दहशतवादी ठार केले होते.

 

Web Title: Indian army killed one terrorist in kathua search operation by armed forces jammu kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • indian army
  • Jammu Kashimir
  • terrorist killed

संबंधित बातम्या

Defense Production: भारतीय लष्कराची ऐतिहासिक झेप! परकीय कंत्राटे ३८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर; स्वदेशी उद्योगांचा डंका
1

Defense Production: भारतीय लष्कराची ऐतिहासिक झेप! परकीय कंत्राटे ३८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर; स्वदेशी उद्योगांचा डंका

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज
2

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश
3

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश

पोखरणच्या रणांगणावर ‘रुद्र शक्ती’ गडगडाट; अपाचे हेलिकॉप्टरच्या घिरट्या,  तोफा अन्…;
4

पोखरणच्या रणांगणावर ‘रुद्र शक्ती’ गडगडाट; अपाचे हेलिकॉप्टरच्या घिरट्या, तोफा अन्…;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.