जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य दले व दहशतवादी यांच्यात चकमक (फोटो- istockphoto)
श्रीनगर: दहशतवादी संघटना सातत्याने जम्मू-काश्मीरमध्ये नापाक कारवाया करताना पाहायला मिळतात. शेजारी राष्ट्र सातत्याने भारतात अशा दहशतवादी कारवाया करताना दिसून येतो. मात्र आपली सुरक्षा दले त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडतात. दरम्यान जम्मू-काश्मीरच्या कठूआ जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय सेना यांच्यात चकमक सुरू आहे. या परिसरात 4 ते 5 दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताच्या लष्कराने या परिसराला वेढा घातला आहे.
कठूआ भागात 4 ते 5 दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. या परिसरात सैन्य दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. लष्कराने या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. दरम्यान सर्च ऑपरेशन राबवले जात असताना दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. यामध्ये भारतीय लष्कराचे 2 जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे.
कठूआ परिसरात 23 मार्चपासून लष्करकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. याच दरम्यान सैन्य दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक देखील झाली. अजूनही ही चकमक सुरू आहे.
जम्मूच्या राजौरीमध्ये सैन्याच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
शेजारील राष्ट्र पाकिस्तान कायमच भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र भारतीय लष्कर अशा नापाक कारवायांना सडेतोड उत्तर देत असते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. मात्र याच दरम्यान काही महत्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या आखनूर सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या भागात काही दशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानुसार हे सर्च ऑपरेशन केले जात आहे.
Jammu Terror Attack: जम्मूच्या राजौरीमध्ये सैन्याच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; घात लावून केला गोळीबार
नियंत्रण रेषेजवळ काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली. त्यानंतर लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच जोगीवन वनक्षेत्रात संशयास्पद हालचाली देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे भट्टल परिसरात लष्कराच्या अनेक तुकड्या शोध मोहीम राबवत आहे. या भागात काही दहशतवादी घुसल्याचा संशय भारतीय लष्कराला आहे.
शोधमोहीम अधिक वेगाने सुरू
भारतीय लष्कर या भागात अत्यंत वेगाने आणि सावधगिरीने शोध मोहीम राबवत आहे. त्यामुळे या परीसरासह संवेनदशील भागात भारतीय लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्यातरी कोणतीही संशयास्पद कृती लष्कराला आढळून आलेली नाही. मात्र सतर्कता पूर्ण बाळगली जात आहे. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. मागील वर्षी याच परिसरात लष्कराने दोन ते तीन दहशतवादी ठार केले होते.