Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; विनंती करूनही भारतात पाठवलं नाही

रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू असून आतापर्यंत हजारो सैनिक व दोन्ही बाजूच्या हजारो नागरिकांनी प्राण गमावले आहेत. दरम्यान, या युद्धात एका भारतीय तरुणाचाही मृत्यू झाला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 13, 2025 | 11:33 PM
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा, एक गंभीर; विनंती करूनही भारतात पाठवलं नाही

रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा, एक गंभीर; विनंती करूनही भारतात पाठवलं नाही

Follow Us
Close
Follow Us:

रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू असून आतापर्यंत हजारो सैनिक व दोन्ही बाजूच्या हजारो नागरिकांनी प्राण गमावले आहेत. दरम्यान, या युद्धात एका भारतीय तरुणाचाही मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचं नाव बिनिल टी. बी. असं असून तो ३२ वर्षांचा होता. बिनिल केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी होता. तर जैन टी. के. (वय २७) हा तरुण जखमी झाला आहे.

काही दिवसांपूर्वी बिनिलच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली होती की एका ड्रोन हल्ल्यात केरळमधील दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर बिनिलच्या कुटुंबाने अधिक माहिती मिळवण्याचा व बिनिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बिनिलची माहिती मिळाली नाही, तसेच त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही.

बिनिल व जैन यांचे नातेवाईक सतीश यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की बिनिलची पत्नी जोसी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. तिला दूतावासाकून अधिकृतरित्या बिनिलच्या निधनाचं वृत्त मिळालं आहे. रशियन सैन्याच्या हवाल्याने तिला ही माहिती देण्यात आली आहे.

बिनिल व जैन गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घरी परतण्यासाठी प्रयत्न करत होते. गेल्या महिन्यात बिनिलने दी इंडियन एक्सप्रेसला काही व्हॉईस मेसेजेस पाठवले होते. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की तो गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून भारतात परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. तो सातत्याने मॉस्कोमधील दूतावासाशी संपर्क साधत होता. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

केरळमध्ये इलेक्ट्रिशियनचं काम करणाऱ्या बिनिलने सांगितलं होतं की “मानसिक व शारीरिकदृष्ट्या आम्ही खूप थकलेलो आहोत. आम्ही रशियाव्याप्त युक्रेनच्या भागात आहोत. आमचे कमांडर आम्हाला सांगत आहेत की तुमचा एक वर्षाचा करार होता. त्यामुळे तुम्हाला असं अर्ध्यातून परत जाता येणार नाही. आम्ही आमच्या सुटकेसाठी स्थानिक कमांडर्सकडे विनवण्या करत आहोत. मात्र ते आम्हाला इथून माघारी परतू देत नाहीत. त्यानंतर आता थेट बिनिलच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे.

Web Title: Indian killed in russia ukraine war trying to come back from few months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 11:33 PM

Topics:  

  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

Russia Airstrike Kyiv : रशियन मिसाईल अन् ड्रोन हल्ल्यांनी हादरलं युक्रेन ; कीव्हमध्ये हाहा:कार
1

Russia Airstrike Kyiv : रशियन मिसाईल अन् ड्रोन हल्ल्यांनी हादरलं युक्रेन ; कीव्हमध्ये हाहा:कार

Luhansk Hostel Attack: लुहान्स्क वसतिगृहावरील प्राणघातक हल्ल्यात 18 जण ठार; रशियाने या हत्याकांडासाठी युक्रेनला धरले जबाबदार
2

Luhansk Hostel Attack: लुहान्स्क वसतिगृहावरील प्राणघातक हल्ल्यात 18 जण ठार; रशियाने या हत्याकांडासाठी युक्रेनला धरले जबाबदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.