Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ISI Spy Arrested: ७ वर्षांची सेवा आणि देशाशी गद्दारी! नौदलाचा सैनिकच निघाला ISIचा गुप्तहेर निघाला

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर हा वाद तीव्र झाला. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक तपास आणि चर्चा सुरू केली. अलिकडेच, दक्षिण आशियातील बदलत्या राजकीय परिस्थितीत शेजारील देशांमध्ये आयएसआयच्या कारवाया वाढत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 11, 2026 | 11:47 AM
Indian Navy,National Security,ISI,Indian Navy Secret Data Leak,

Indian Navy,National Security,ISI,Indian Navy Secret Data Leak,

Follow Us
Follow Us:
  • ISI शी हेरिगिरी केल्याप्रकरणी आग्रा येथील सैनिकाला देशद्रोहाखाली अटक
  • कोची येथील दक्षिण नौदल कमांडमध्ये ‘लान्स नाईक’ म्हणून कार्यरत
  • नौदलाचे गोपनीय फोटो आणि युद्धनौकांचा संवेदनशील डेटा पाकिस्तानातील हँडलर्सना पुरवल्याचे तपासात निष्पन्न
UP Police-ATS Action on ISI Spy: उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नौदलाच्या सौनिकाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. आदर्श कुमार ऊर्फ लकी असे या सैनिकाचे नाव आहे. आदर्श कुमारवर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणाISI साठी हेरगिरी केल्याच आरोप आहे. पण त्याचवेळी देशाच्या संरक्षणाची प्रतिज्ञा घेणाऱ्या सैनिकानेच असे कृत्य केल्याने देशभरातून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेला आरोपी आदर्श कुमार उर्फ ​​लकी हा आग्रा येथील कागरौल परिसरातील चित गावचा रहिवासी आहे. तो गेल्या सात वर्षांपासून भारतीय नौदलात सेवा करत आहे.सध्या केरळमधील कोची येथील दक्षिण नौदल कमांडमध्ये लान्स नाईक म्हणून तैनात आहे. गेल्या महिन्यातच, फेब्रुवारीमध्ये त्याने मथुरा येथील एका तरूणीशी लग्न केले. लग्नानंतर, तो हनिमूनसाठी दुबईला गेला होता. हनिमूननंतर पत्नीसह दोन दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. पण गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होती. तो गावात पोहोचताच, यूपी एटीएसने त्याला अटक केली आणि १० मार्च २०२६ रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवले.

IndiGo मध्ये मोठी उलथापालथ! CEO Pieter Elbers यांचा तडकाफडकी राजीनामा

नौदलाचे गुप्त फोटो आणि युद्धनौका डेटा पाकिस्तानला पाठवला

काही काळापासून तपास यंत्रणांना आग्र्यातून कोणीतरी पाकिस्तानमधील हँडलर्सशी संपर्क साधून देशाची धोरणात्मक माहिती लीक करत असल्याची माहिती मित होती. एटीएसने इलेक्ट्रॉनिक आणि भौतिक देखरेखीद्वारे सापळा रचला त्यावेळी आदर्श कुमारचे नाव संशयित म्हणून समोर आले.

 

सात वर्षांची निष्ठा अशा प्रकारे संपली, हेरगिरीच्या बदल्यात पैसे मिळाले

आदर्शच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार करता, त्याचे वडील बलवीर सिंग दारू कंत्राटदार म्हणून काम करतात. तो तीन बहिणींमध्ये सर्वात धाकटा मुलगा होता आणि संपूर्ण कुटुंबाला त्याचा अभिमान होता. सात वर्षांपूर्वी तो नौदलात सामील झाला तेव्हा गावात आनंदाचे वातावरण होते, परंतु आज तेच गावाने त्याला देशद्रोही म्हणत आहे.

एटीएस (ATS) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आदर्श कुमारने केवळ गोपनीय कागदपत्रेच शेअर केली नाहीत तर तो पाकिस्तानी नेटवर्कला सहकार्य करत होता. त्याने अनेक देशविरोधी कारवायांमध्येही सहभागी असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या माध्यमातून त्याच्या देशविरोधी हालचांली सिद्ध होत आहेत. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Modi Cabinet Decision: मोदी सरकारने तिजोरी उघडली! ८.८ लाख कोटींच्या ६ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी; असा असेल मेगा प्लॅन

अधिक सहभागाचा संशय

या अटकेनंतर, उत्तर प्रदेश एटीएस आता आदर्श ज्या संपूर्ण नेटवर्कशी संबंधित होता त्याची चौकशी करत आहे. सुरक्षा संस्थांसाठी एक सैनिक शत्रू एजंटच्या जाळ्यात कसा अडकला, हा एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे.  या हेरगिरी प्रकरणात नौदलातील किंवा इतर विभागातील इतर व्यक्तींचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. आरोपीचे संपर्क आणि बँक खात्यांची कसून तपासणी केली जात आहे, त्याला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत आणि त्याने किती मोठे कट रचले, यासंबंधीची माहिती मिळवली जात आहे.

 

 

Web Title: Indian navy sailor arrested for spying for pakistans isi detained by up ats in agra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Indian Navy
  • up

संबंधित बातम्या

SAGAR Vision : भारताकडून श्रीलंकेला 50 लाख डॉलर्सची लष्करी उपकरणे सुपूर्द; कोलंबोनेही म्हटले, ‘भारत हा आमचा….’
1

SAGAR Vision : भारताकडून श्रीलंकेला 50 लाख डॉलर्सची लष्करी उपकरणे सुपूर्द; कोलंबोनेही म्हटले, ‘भारत हा आमचा….’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.