Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोरखपूर एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची उपस्थिती; डॉक्टरांना दिला खास संदेश

गोरखपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पहिल्या दीक्षांत समारंभाला सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थिती लावली. या विशेष प्रसंगी राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 01, 2025 | 02:08 AM
गोरखपूर एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची उपस्थिती; डॉक्टरांना दिला खास संदेश

गोरखपूर एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची उपस्थिती; डॉक्टरांना दिला खास संदेश

Follow Us
Close
Follow Us:

गोरखपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पहिल्या दीक्षांत समारंभाला सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थिती लावली. या विशेष प्रसंगी राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली आणि त्यांच्याशी संवाद साधत वैद्यकीय व्यवसायातील जबाबदाऱ्या व सेवाभावाबद्दल मार्गदर्शन केलं.

समारंभास उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, गोरखपूरचे खासदार रवि किशन, एम्स गोरखपूरचे अध्यक्ष देशदीपक वर्मा आणि संस्थेच्या कार्यकारी संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता हे मान्यवरही उपस्थित होते.

BJP New State President : भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला

राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वैद्यकीय क्षेत्र केवळ एक व्यवसाय नसून ती एक “सेवा” आहे. डॉक्टरांचे संवेदनशील व समर्पित वागणूक हे रुग्णाच्या आरोग्यावर मोठा परिणाम करते. त्यांनी म्हटले, “डॉक्टरांच्या संवेदनशीलतेने रुग्णाला केवळ औषध नव्हे, तर आत्मविश्वास आणि मानसिक आधारही मिळतो. त्यामुळे आरोग्य लवकर सुधारते. म्हणूनच वैद्यकीय पेशाला एक पवित्र सेवा मानली जाते.”

एम्स संस्थांबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एम्स हे केवळ उपचार केंद्र नसून, हे शिक्षण, सेवा आणि समर्पण यांचे प्रतीक आहे. “एम्सचे नाव ऐकताच अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा आणि सेवाभावी डॉक्टरांची प्रतिमा मनात तयार होते. हे संस्थान भारताच्या वैद्यकीय क्षमतेचे प्रतीक बनले आहे,” असे त्या म्हणाल्या.

गोरखपूर एम्सने अल्पावधीतच शिक्षण, संशोधन आणि वैद्यकीय सेवा या तीनही क्षेत्रांत लक्षणीय प्रगती साधली आहे, असे राष्ट्रपतींनी गौरवोद्गार काढले. त्यांनी नमूद केले की एम्स संस्थांनी उपचारांच्या नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत, आयुष व अ‍ॅलोपॅथीच्या समन्वयातून नवनवीन उपचार पद्धती विकसित केल्या आहेत. “एम्सने नावीन्यपूर्णतेला आपली कार्यशैली बनवली आहे. त्यामुळे हे केंद्र केवळ वैद्यकीय शिक्षणाचे नव्हे, तर गुणवत्तापूर्ण सेवांचे केंद्र बनले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपतींनी गोरखपूर एम्सची विशेषतः प्रशंसा केली. हे संस्थान आता पूर्व उत्तर प्रदेश, सीमावर्ती बिहार आणि नेपाळच्या भागांतील नागरिकांसाठी एक विश्वासार्ह वैद्यकीय सेवा केंद्र म्हणून उदयास येत आहे. “गरीब असो वा श्रीमंत, ग्रामीण भागातील असो वा शहरी, इथे सर्वांना समान दर्जाची आणि परवडणारी सेवा मिळते,” असे त्या म्हणाल्या.

Asaduddin Owaisi : बिहारमध्ये NDA चं टेन्शन वाढलं! ओवेसींचा पक्ष महाआघाडीत सामील होणार

शेवटी राष्ट्रपती मुर्मू यांनी नवपदवीधर डॉक्टरांना उद्देशून सांगितले की, “डॉक्टर होणं म्हणजे केवळ करिअर नव्हे, तर देशसेवेचं माध्यम आहे. तुम्ही केवळ रुग्ण बरे करत नाही, तर समाज आरोग्यवान आणि सक्षम बनवता. म्हणूनच तुमचं योगदान केवळ वैयक्तिक नाही, तर राष्ट्रीय स्तरावर अमूल्य आहे.”या समारंभात गोरखपूर एम्सच्या विकासाचा आणि वैद्यकीय शिक्षणातील प्रगतीचा गौरव करण्यात आला. हे संस्थान भविष्यातही अशीच सेवा, गुणवत्ता आणि नवोन्मेषतेची परंपरा कायम राखेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

 

Web Title: Indian president droupadi murmu attended convocation ceremony gorakhpur aiims latest news uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 02:08 AM

Topics:  

  • AIIMS Delhi
  • Doctor
  • Droupadi Murmu

संबंधित बातम्या

‘…तर डॉक्टरला दोषी ठरवता येणार नाही,’ महिलेच्या मृत्यूवर सुप्रीम कोर्टाने केली मोठी टिप्पणी
1

‘…तर डॉक्टरला दोषी ठरवता येणार नाही,’ महिलेच्या मृत्यूवर सुप्रीम कोर्टाने केली मोठी टिप्पणी

उशीर होण्याआधी वेळीच ओळखा बालकांमधील दृष्टिदोष
2

उशीर होण्याआधी वेळीच ओळखा बालकांमधील दृष्टिदोष

धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
3

धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

‘विकसित महाराष्ट्र 2047’साठी आयआयएम मुंबईकडून नवीन सॅटेलाइट कॅम्पसचा प्रस्ताव
4

‘विकसित महाराष्ट्र 2047’साठी आयआयएम मुंबईकडून नवीन सॅटेलाइट कॅम्पसचा प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.