एका महिन्यात ट्रेनमधील ब्लँकेट किती वेळा धुतले जाते? देशाच्या रेल्वेमंत्र्यांचे उत्तर ऐकाच
भारतीय रेल्वेतून आपण सर्वांनीच एकदा तरी प्रवास केलाच असेल. मुंबईतील कित्येक चाकरमानी तर गावी जाण्यासाठी रेल्वेचाच वापर करताना दिसतात. खरंतर रेल्वेने देशाला जोडण्याचे काम केले आहे. तसेच भारतीय रेल्वे जगातील स्वस्त रेल्वे सेवा देणाऱ्यांपैकी एक आहे.
रेल्वेतून फिरताना तुम्ही अनेकदा पहिले असेल की कुठल्याही एक्सप्रेसमध्ये एसी कोच असतोच. हा कोच इतर कोचच्या तुलनेत आरामदायी असतो ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या कोचेसमध्ये वापरले जाणारे ब्लँकेट किती वेळा धुतले जातात. हा एक सामान्य प्रश्न आहे ज्याचे उत्तर देशाच्या रेल्वेमंत्र्यांनी म्हणजेच अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे.
जर तुम्ही ट्रेनने अनेकदा प्रवास करत असाल तर नक्की तुम्ही एसी डब्यांमधील ब्लँकेट वापरले असेल. रेल्वेने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, प्रवासादरम्यान मिळालेले बेडशीट आणि पिलो कव्हर प्रत्येक प्रवासानंतर धुतले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की ट्रेनमधील ब्लँकेट हे किती वेळा धुतली जातात? खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे.
ट्रेनमधील ब्लँकेट किती वेळा धुतले जातात? हा सामान्य प्रेषण काँग्रेस खासदार कुलदीप इंदोरा यांनी बुधवारी लोकसभेत विचारला होता. वास्तविक, रेल्वे स्वच्छतेच्या मानकांनुसार प्रवाशांना बेड पुरवण्यासाठी पैसे घेते. इंदोरा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, रेल्वे प्रवाशांचे ब्लँकेट महिन्यातून एकदा तरी धुतले जातात.
बेड रोल किटमध्ये रजाई कव्हर म्हणून एक्सट्रा चादर समाविष्ट करण्यात आल्याचेही वैष्णव यांनी यावेळी लोकसभेत सांगितले. मंत्र्यांच्या लेखी उत्तरात हे स्पष्ट झाले आहे की, सध्या रेल्वेकडून प्रवाशांना पुरविण्यात येणारे ब्लँकेट हलके, धुण्यायोग्य आणि प्रवासादरम्यान आरामासाठी उत्तम इन्सुलेशन प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. रेल्वेमंत्री म्हणाले की नवीन आणि चांगल्या दर्जाच्या बेडिंगसाठी बीआयएस मानकांनुसार लिनेन सेटची तरतूद आहे.
पुढे रेल्वेमंत्री म्हणाले की स्वच्छतेमध्ये ऑटोमॅटिक लाँड्री फॅसिलिटी, प्रमाणित वॉशिंग इक्यूपमेन्ट, विशिष्ट स्वच्छता एजंट्स आणि लॉन्ड्री प्रक्रियेची देखभाल यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की पांढरे मीटर धुतलेल्या लिनेनची गुणवत्ता तपासते. इतकेच नाही तर लिनेनच्या वस्तूंचे आयुष्य कमी करण्यात आले आहे. तसेच नवीन वस्तू पूर्वीपेक्षा वेगाने बदलल्या जाऊ शकतात.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढे नमूद केले की रेलमदद पोर्टलवर लिनेन/बेडरोलशी संबंधित तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी विभागीय मुख्य कार्यालय आणि विभागीय स्तरावर वॉर रूम तयार करण्यात आले आहेत.