
Know why RPF Foundation Day 2025 is special
RPF Foundation Day 2025 : भारतामध्ये रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. गावी जाणारा शेतकरी असो, नोकरीसाठी धावपळ करणारा कामगार असो की देशभरात भ्रमंती करणारा प्रवासी असो भारतीय रेल्वे ही त्यांची जीवनरेखा आहे. या विशाल जाळ्यात केवळ ट्रेन धावतात असे नाही, तर त्यात प्रत्येक प्रवाशाचा विश्वास, सुरक्षितता आणि आशा सामावलेली असते. आणि याच विश्वासाच्या रक्षणासाठी २० सप्टेंबर हा दिवस खास आहे. कारण हा दिवस रेल्वे संरक्षण दल म्हणजेच RPF (Railway Protection Force) चा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.
२० सप्टेंबर १९८५ रोजी भारताच्या संसदेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. रेल्वे संरक्षण दल कायद्यात दुरुस्ती करून RPF ला “संघाचे सशस्त्र दल” असा दर्जा देण्यात आला. ही केवळ औपचारिक घोषणा नव्हती, तर त्यामागे प्रवाशांच्या सुरक्षेचे दायित्व, जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव होती. त्यानंतर RPF फक्त एक पोलीस दल राहिले नाही, तर ते देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gold Card Visa : डोनाल्ड ट्रम्प यांनी $1 दशलक्षला विकत घेतले ‘गोल्ड कार्ड’; पाहा ‘या’ योजनेचा का होतोय इतका गाजावाजा?
या वर्षी २० सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा हा दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षी हा दिवस RPF साठी केवळ उत्सवाचा नसतो, तर तो त्यांच्या योगदानाचे स्मरण, शौर्याचा गौरव आणि भविष्यासाठी नवीन शपथ घेण्याचा क्षण ठरतो. या दिवशी RPF च्या विविध क्षेत्रीय युनिट्समध्ये कार्यक्रम होतात. अधिकारी व जवान आपली कामगिरी मांडतात, शौर्यकथा सांगतात, आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक जबाबदारीने काम करण्याची प्रतिज्ञा करतात.
आज रेल्वे प्रवाशांना सुरक्षित वाटते, त्यामागे या दलाची सातत्यपूर्ण मेहनत आहे.
RPF हे फक्त कायद्याचे रक्षक नाहीत, तर प्रवाशांचे खरे मित्र आहेत. अनेकदा प्रवासी त्यांच्या कहाण्या सोशल मीडियावर शेअर करतात कुणाला योग्य वेळेस औषध मिळाले, कुणाची हरवलेली बॅग परत आली, तर कुणाला रात्रीच्या प्रवासात RPFच्या उपस्थितीमुळे निर्धास्त झोप मिळाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इतिहासातील जिवंत स्फोटक! 80 वर्षांपासून गुप्त असलेल्या दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बमुळे बर्लिनमध्ये 10,000 लोक झाले बेघर
आज रेल्वे प्रवास अधिक वेगवान, तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत आहे. सायबर फसवणूक, ऑनलाइन तिकिट फसवणूक, तस्करीचे नवे मार्ग या सगळ्यांना RPFला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच त्यांना सतत नवी शस्त्रे, आधुनिक तंत्रज्ञान आणि ताज्या प्रशिक्षणाची गरज असते. आरपीएफ स्थापना दिन हा केवळ एका संघटनेचा उत्सव नाही. तो प्रत्येक भारतीय प्रवाशासाठी सुरक्षिततेची हमी आहे. जेव्हा आपण गाडीत बसतो आणि निर्धास्तपणे प्रवास करतो, तेव्हा त्यामागे RPFच्या शेकडो जवानांची मेहनत, जागरणे आणि धडपड दडलेली असते. २० सप्टेंबर २०२५ रोजी जेव्हा पुन्हा एकदा हा दिवस साजरा केला जाईल, तेव्हा हा केवळ एका तारखेचा सोहळा नसून प्रवाशांचा विश्वास, रेल्वेची सुरक्षितता आणि भारताच्या सुरक्षेचा उत्सव ठरेल.