Operation Sindoor: भारताच्या स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होत असताना, देशाने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मध्ये अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या जवानांचा विशेष सन्मान केला आहे. भारतीय सुरक्षा दलांच्या या पराक्रमी जवानांना त्यांच्या असामान्य शौर्य आणि उत्कृष्ट सेवेसाठी विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूरमधील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी भारतीय हवाई दलाच्या एकूण १३ अधिकाऱ्यांना ‘युद्ध सेवा पदक’ (Yudh Seva Medal) आणि ९ अधिकाऱ्यांना ‘वीर चक्र’ (Vir Chakra) प्रदान करण्यात आले आहे.
‘वीर चक्र’ हा भारतातील तिसरा सर्वात मोठा युद्धकालीन शौर्य पुरस्कार आहे. पाकिस्तानमधील मुरीदके (Muridke) आणि बहावलपूर (Bahawalpur) येथील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ले करणारे लढाऊ वैमानिक आणि इतर ९ अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या धाडसी कारवाईत भारतीय हवाई दलाने कमीत कमी सहा पाकिस्तानी विमाने (Pakistani Air Force) पाडली होती.
भारतीय वायु सेना के 26 अधिकारियों और वायुसैनिकों को वायु सेना पदक (वीरता) से सम्मानित किया गया, जिनमें वे लड़ाकू पायलट शामिल हैं जिन्होंने पाकिस्तान के अंदर लक्ष्यों को भेदने के मिशन में भाग लिया था। वे अधिकारी और सैनिक भी शामिल हैं जिन्होंने S-400 और अन्य वायु रक्षा प्रणालियों… pic.twitter.com/Z0svHgBqDo
— ANI_HindiNews (@AHindinews) August 14, 2025
संरक्षण आणि हवाई हल्ल्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी १३ अधिकाऱ्यांचा ‘युद्ध सेवा पदकाने’ गौरव करण्यात आला आहे. यात एअर व्हाईस मार्शल जोसेफ सुआरेस, एअर व्हाईस मार्शल प्रज्वल सिंग आणि एअर कमोडोर अशोक राज ठाकूर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूरमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी हवाई दलाच्या उप-प्रमुख एअर मार्शल नरनदेश्वर तिवारी, वेस्टर्न एअर कमांडचे कमांडर एअर मार्शल जीतेंद्र मिश्रा आणि एअर कॅम्प्सचे महासंचालक एअर मार्शल अवधेश भारती यांच्यासह चार अधिकाऱ्यांना ‘सर्वोत्तम युद्ध सेवा पदक’ (Sarvottam Yudh Seva Medal) देण्यात आले आहे.
या पुरस्कारांमुळे भारतीय सुरक्षा दलांच्या शौर्य आणि समर्पणाची गाथा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, ज्यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी आपले सर्वस्व पणाला लावले.