
Pakistan claims to have brought India to its knees in four days
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे. मात्र पाकिस्तान अद्यापही सुधारलेला नाही. पाकिस्तानचे अधिकारी आणि लष्करप्रमुख भारताविरोधी विधाने करतच आहे. यावेळी शरीफ यांनी भारताला चार दिवसांत धडा शिकवल्याटा दावा केला आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी चीनमध्ये आर्मी रॉकेट फोर्स तयार करण्याचे म्हटले आहे. याचा उद्देश देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ करणे आणि आधुनिक युद्धासाठी शत्रूला प्रत्युत्तर देता येईल असा उद्देश असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक संतुलनासाठी हे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुतिनचा पारा चढला! अलास्का बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी दिली मोठी चेतावणी; म्हणाले…
याच वेळी ‘ऑपरेशन सिंदूर’चा (Operation Sindoor) उल्लेख करत त्यांनी भारताला धडा शिकल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे ती, भारत आता पिढ्या न पिढ्या हे लक्षात ठेवले. चार दिवसांत त्यांनी भारताला नतमस्तक व्हायला लावल्याचा दावा शरीफ यांनी केला आहे. त्यांच्या सैन्याने शत्रूला गुडघे टेकायला मजबूर केले असल्याचे म्हटले आहे. याच वेळी शाहबाज यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donlad Trump) यांचेही भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीसाठी आभारा मानले आहेत.
🚨🇵🇰 Pakistan’s PM Shehbaz Sharif announces creation of Army Rocket Forces pic.twitter.com/PWrzEZvBzr — Sputnik India (@Sputnik_India) August 14, 2025
याच वेळी शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी पाकिस्तान काश्मीरी बांधवांच्या पाठीशी त्यांचे हक्क मिळेपर्यंत उभा राहिल असे आश्वासन दिले आहे.
तसेच शरीफ यांनी चीन, तुर्की आणि सौदी अरेबियाचे आभार मानले आहे. भारतासोबतच्या संघर्षाता साथ दिल्याबद्दल चीन, सौदी अरेबिया, तुर्की, अझरबैजान, युएई आणि इराण यासारख्या देशांचे आभार मानले आहेत.
कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी