
Most powerful countries in the World: ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’ने जाहीर केलेल्या २०२६ च्या १० सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर फेकला गेला आहे. या यादीत भारताला चक्क १२ व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आणि चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद असलेल्या भारतासाठी हे मानांकन आश्चर्यकारक मानले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. चीन आणि रशियाने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे.
India-Germany Trade: जर्मनीशी करार उघडेल युरोपचा दरवाजा? भारताची मोठी आर्थिक रणनीती
जगातील सर्वाधिक लोकसंख्या आणि अण्वस्त्र सज्ज देश असूनही भारताला पहिल्या १० मध्ये स्थान न मिळाल्याने तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूने जाहीर केलेल्या जागतिक रँकिंगसाठी विविध महत्त्वाच्या घटकांचा विचार केला जातो. या संस्थेच्या दाव्यानुसार, देशांची क्रमवारी ठरवताना आर्थिक क्षमता, लष्करी संसाधने, तांत्रिक प्रगती, लोकसंख्याशास्त्रीय ताकद, प्रशासनाची स्थिरता तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये प्रभावी सहभागाची क्षमता या बाबींचे मूल्यमापन केले जाते.
यादीतील देशांचे मूल्यांकन प्रामुख्याने पाच निकषांवर आधारित असते. यामध्ये लष्करी युती, आंतरराष्ट्रीय युती, राजकीय प्रभाव, आर्थिक प्रभाव आणि नेतृत्व या घटकांचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रांत सातत्याने प्रभावी कामगिरी करणाऱ्या देशांना सर्वोच्च क्रमांक देण्यात येतो. त्यामुळे अशा देशांची जागतिक पातळीवरील ओळख आणि प्रतिष्ठा अधिक बळकट होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ठाकरेंच्या युतीचा फटका सर्वात जास्त राज ठाकरेंना…! देवेंद्र फडणवीसांनी सांगितली राजनीती
जागतिक व्यापार आणि राजकारणात त्या देशाचा शब्द किती पाळला जातो.
लष्करी युती नाटो सारख्या आंतरराष्ट्रीय आघाड्यांमधील सहभाग, लष्करी
तंत्रज्ञान प्रगती एआय आणि प्रगत तंत्रज्ञानातील संशोधनाचा स्तर,
प्रशासकीय स्थिरता देशांतर्गत शासन व्यवस्था किती स्थिर आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा जागतिक मंचावर त्या देशाची ओळख आणि नेतृत्व करण्याची क्षमता.
अनुक्रमे देशनिहाय यादी
१. संयुक्त राज्य अमेरिका
२. वीन
३. रशिया
४. युनायटेड किंगडम
५. जर्मनी
६. दक्षिण कोरिया
७. फ्रान्स
८. जपान
९. सौदी अरेबिया
१०. इसायल
अहवालानुसार, जगातील सर्वात शक्तिशाली देश ठरवणे हे केवळ आकडेवारीवर अवलंबून नसते. यात लष्करी ताकदीसोबतच आर्थिक दबदबा, राजकीय प्रभाव आणि “सांस्कृतिक प्रभाव यांचाही मोठा वाटा असतो.” अमेरिकेतील ‘पेन्सिलवेनिया युनिव्हर्सिटी ‘च्या व्हार्टन स्कूल आणि ‘बीएव्ही ग्रुप’ च्या जागतिक सर्वेक्षणाच्या आधारावर ही यादी तयार करण्यात आली आहे.
यादी तयार करणे हे अत्यंत कठीण काम आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, जगातील सर्वात शक्तिशाली देशांची निवड करणे आपल्या कल्पनेपेक्षा अधिक आव्हानात्मक आहे. कारण शक्ती केवळ एका घटकावर अवलंबून नसून ती विविध स्वरूपांत दिसून येते. लष्करी सामर्थ्य, आर्थिक ताकद, राजकीय प्रभाव तसेच सांस्कृतिक प्रभाव अशा अनेक बाबींचा त्यात समावेश होतो. जगातील शक्तिशाली देशांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर ठळक प्रभाव असतो. त्यांच्याकडे मजबूत लष्करी क्षमता आणि प्रभावी परराष्ट्र धोरण असते, ज्याचे परिणाम संपूर्ण जगभर जाणवतात.
ही क्रमवारी विविध सर्वेक्षणांच्या आधारे निश्चित केली जाते. यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट, बीएव्ही ग्रुप आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने दरवर्षी ‘सर्वोत्तम देश’ ही जागतिक क्रमवारी जाहीर केली जाते. या प्रक्रियेत जगभरातील नागरिकांकडून सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा केली जाते आणि ठरावीक निकषांनुसार मिळालेल्या प्रतिसादांच्या आधारे जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी निश्चित केली जाते.