
Indigo Flights Cancellation: Over 2000 Flights Cancelled in Six Days, Chaos at Delhi Airport
Indigo flights cancellation: इंडिगोच्या उड्डाणांभोवतीचे संकट सलग सहाव्या दिवशीही सुरूच राहिले. रविवारी, ७ डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावर इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना वाढत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लांब रांगा लागल्या होत्या. उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागली. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, दिल्ली विमानतळावरील उड्डाण माहिती स्क्रीनवर इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाल्याचे वृत्त प्रदर्शित झाले होते.
दुसरीकडे चेन्नई विमानतळावरही ३० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही इंडिगोच्या अनेक प्रवाशांना उड्डाणे रद्द होण्याचा आणि विलंबाचा सामना करावा लागला. गेल्या पाच दिवसांत इंडिगोची २००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. ज्यामुळे दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या प्रमुख केंद्रांवरही त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
Indigo Crisis : रद्द झालेल्या हजारो उड्डाणांचा अखेर निकाल; प्रवाशांना आज मिळणार इंडिगोच्या तिकिटांचा
इंडिगोने शनिवारी एक निवेदन जारी करत, ८०० हून अधिक उड्डाणे रद्द केली. तर शुक्रवारी १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. विमान कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये सतत वाढत असलेल्या गोंधळामुळे प्रवाशांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
या संकटादरम्यान, सरकारने विमान भाडे नियंत्रित करण्याचा आदेश जारी केला. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ५०० किलोमीटरपर्यंतच्या विमानांसाठी कमाल भाडे ७,५००, ५०० ते १,००० किलोमीटरच्या विमानांसाठी १२,०००, १,००० ते १,५०० किलोमीटरच्या विमानांसाठी १५,००० आणि १,५०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या विमानांसाठी १८,००० असे निश्चित करण्यात आले आहे. हे नियम बिझनेस क्लास आणि उडान योजनेच्या विमानांना लागू होणार नाहीत.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो संकटामुळे शनिवारी ८०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यानंतर आज ६ व्या दिवशीही इंडिगोच्या सहाव्या दिवशीही सुरू आहे. तथापि, इंडिगोने त्यांच्या ९५% मार्गांवर उड्डाणे सामान्य केल्याचा दावा केला आहे.
१३८ पैकी १३५ ठिकाणी विमानसेवा सुरू असल्याचे एअरलाइनने सांगितले. जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी बराच वेळ लागेल.
दरम्यान, रविवारीही इंडिगोच्या ३५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये दिल्ली, चेन्नई, जयपूर, हैदराबाद, भोपाळ, मुंबई आणि त्रिची येथून निघणाऱ्या विमानांचा समावेश आहे.
यापूर्वी, एअरलाइनने शुक्रवारी सुमारे १,६०० आणि शनिवारी सुमारे ८०० उड्डाणे रद्द केली होती.