Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध

अहिल्यानगर मधील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराज यात्रा महोत्सवाला आज सुरुवात झाली आहे. यावेळी परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2026 | 08:26 PM
भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज!

भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज!

Follow Us
Follow Us:

संदीप शेवाळे/ पाथर्डी: श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा महोत्सवाचा मुख्य दिवस असून लाखो भाविकांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व देवस्थान ट्रस्टने व्यापक आणि सर्वांगीण नियोजन केले आहे. सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नवीन विश्वस्त मंडळाची निवड जानेवारी महिन्यात झाल्यानंतर अवध्या एका महिन्यात प्रलंबित कामे मार्गी लावून यात्रेचे नियोजन करण्यात आले. वाढत्या भाविक संख्येचा विचार करून सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मंदिर परिसरात सध्या ७२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून पोलिस प्रशासनासाठी स्वतंत्र ३२ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅमेरे तैनात केले आहेत. अग्निसुरक्षेसाठी अग्निशमन गाडी आणि ४० फायर एक्सटिंग्विशर उपलब्ध ठेवले आहेत.

Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…

आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहे. यात्रा कालावधीत पोलिस, आरोग्य, महावितरण, अग्निशमन, स्वयंसेवक, भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन केले आहे. तसेच २० हजार चौरस फूटांचा हॉल, स्वतंत्र जेवणगृह, स्वयंपाकगृह,

निवारा हॉल, स्वच्छतागृहे आणि पक्की पार्किंग व्यवस्था केली आहे. १३ खोल्यांचा भक्तनिवासही भाविक व स्वयंसेवकांसाठी खुला ठेवला आहे. वाढती गर्दी लक्षात घेता ११ ते १७ मार्च या कालावधीत मुक्तद्वार दर्शनाची सुविधा आहे. १८ मार्चला फुलबाग यात्रेदिवशी समाधी मंदिरात केवळ कावडधारकांना प्रवेश दिला जाणार आहे. ट्रस्टच्या नावाखाली होणाऱ्या अनधिकृत वसुलीपासून सावध राहण्याचे आणि नाथ पालख्या व निशाण मिरवणुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

यात्रोत्सव सुरळीत होण्यासाठी देवस्थान अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड, सर्व विश्वस्त परिश्रम घेत आहेत.

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी

वाहतूक सुरळीतसाठी चार पर्यायी मार्ग

वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. निवडूंगा मार्ग येण्यासाठी, तिसगाव मार्ग बाहेर जाण्यासाठी, पाथर्डी-धामणगाव-मढी मार्ग दुहेरी वाहतूक, मायंबा घाट मार्ग केवळ दुचाकी वाहनांसाठी ठेवण्यात आला आहे. एसटी स्टैंड धामणगाव रस्त्यालगत हलविले आहे.

यात्रोत्सवासाठी आणखी काही उपलब्ध सुविधा

  • मंदिर परिसरात नऊ ठिकाणी पाणी पोस्ट
  • अखंड वीजपुरवठ्यासाठी ४५ केव्हीए, २५ केव्हीए, ६२.५ केव्हीए व इतर जनरेटरची स्टैंडबाय व्यवस्था
  • कचरा डेपो, ड्रेनेज लाईनची कामे पूर्ण फिरते शौचालय उपलब्ध
  • अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थाची तपासणी

वाहनकोंडी टाळण्यासाठी पाच ठिकाणी वाहनतळ

वाहनकोंडी टाळण्यासाठी पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनतळ उभारले आहेत, धामणगाव रस्त्यालगत ३८ एकर जागेत एसटी व चारचाकी वाहनतळ, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ २.५ एकर जागेत दुचाकी वाहनतळ, निवडुंगे रोडलगत चार एकर जागेत चारचाकी वाहनतळ, श्रीराम चौकाजवळ दुचाकी वाहनतळ, मंगल कार्यालय परिसरात अस्थानधारकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे.

Web Title: Ahilyangar news pathardi madhi kanifnath maharaj yatra begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Pathardi

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
1

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
2

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
3

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.