Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मेट्रो-१२ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कल्याण-शिळ रोडवर ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2026 | 01:59 PM
Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

Follow Us
Follow Us:
  • कल्याण-शिळ मार्गावर टप्प्याटप्प्याने प्रवेशबंदी
  • ‘या’ तारखांमध्ये वाहतुकीवर निर्बंध
  • कल्याण-शिळ रोडवर ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
कल्याण-शिळ मार्गावरील मेट्रो-१२ प्रकल्पाच्या कामामुळे परिसरात वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य आणि उपकरणे उभारण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक विभागाने विशेष अधिसूचना जारी करून काही मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक नियंत्रण लागू केले आहे.

“हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे…”; अजितदादांच्या आठवणींने सुनीलकुमार मुसळे भावूक

प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मेट्रो-१२ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कल्याण तळोजा मार्गावर सुरू असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी कल्याण-शिळ रस्त्यावर विविध ठिकाणी मोठ्या आकाराचे गार्डर बसविणे, पिलर उभारणे तसेच जड यंत्रसामग्री उभी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे काही ठिकाणी रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत असल्याने वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाहतुकीची सुरक्षितता आणि सुरळीतता राखण्यासाठी वाहतुक निबंध लागू केले आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created)

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

या सर्व टप्प्यांमध्ये वाहतुकीचे नियोजन करून वाहतूक पोलिसांकडून आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्बंधांचा परिणाम मुख्यत्वे रात्रीच्या वाहतुकीवर होणार असला तरी वाहनचालकांनी संबंधित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा, पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

टप्याटप्याने प्रवेशबंदी

टप्या १- ६ मार्च ते १० मार्च या कालावधीत दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कल्याण – शिळ रोडवरून शिळफाटा ते कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सोनारपाडा पिलर क्रमांक १८० येथे प्रवेशबंदी करण्यात येणार आहे, या काळात संबंधित वाहने सोनारपाडा पिलर परिसरातून डावीकडे वळून सर्विस रोडमार्गे पुढे जाऊन डी. एन. एस. चौक मार्गे आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील.

टप्पा २- ११ मार्च ते १८ मार्च या कालावधीत त्याच वेळेत विक्रमानगर पिलर क्रमांक १०५ येथे वाहतूक रोखण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी विक्रमानगर परिसरातून सर्विस रोडचा वापर करून पुढील मार्गक्रमण करावे.

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

टप्पा ३ – १९ मार्च ते २५ मार्चदरम्यान मानपाडा चौक पिलर क्रमांक २०० परिसरात वाहतुकीवर निबंध लागू राहतील. या काळातही वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

टप्पा ४ – २६ मार्च ते ३१ मार्चदरम्यान सोनारपाडा पिलर क्रमांक १४६ येथे रात्रीच्या वेळेत प्रवेशबंदी लागू राहणार आहे. या काळात वाहनचालकांना सर्विस रोडचा वापर करून डी. एन. एस. चौकमार्गे पुढे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Traffic restrictions on kalyan shil road due to mumbai metro line 12 work check dates and diversion routes thane news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Thane news

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.