
इंडिगोच्या सावळ्या गोंधळामुळे प्रवाशांचे हाल
पुण्यातून 42 उड्डाणे झाली रद्द
इंडिगोचे विमान रद्द होण्याचे प्रकरण पोचले सुप्रीम कोर्टात
पुणे: देशभरातील इंडिगो (Indigo)एअरलाईन्सच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे देशातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याने विमान प्रवाशांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केले जाणार आहे. दरम्यान देशातील अनेक विमानतळावर प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.
इंडिगो एअरलाइन्सचा बिघडलेले वेळापत्रक याचा परिणाम अनेक एअरपोर्टवर झाला आहे. अन्य कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात वाढ केली आहे. पुणे एअरपोर्टवर याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुण्यातून इंडिगोची ४६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बाहेरून पुण्यात येणारी २३ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेक विमानांचे बदलले जात असल्याचे समोर आले आहे.
इंडिगोची विमाने आरडीएस झाल्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंडिगोची विमान सेवा कोलमडल्यानंतर प्रवाशांच्या अडचणींना प्रतिसाद म्हणून, रेल्वे आणि स्पाइसजेटने पावले उचलली आहेत. रेल्वेने ३७ गाड्यांमध्ये ११६ अतिरिक्त कोच जोडले आहेत. पुढील काही दिवसांसाठी स्पाइसजेट १०० जास्तीची उड्डाणे घेणार असल्याची माहिती आहे. रेल्वे विभागाकडूनही जास्त मागणी असलेल्या मार्गांवर रेल्वे चालवण्यास मान्यता दिली आहे. यामुळे एकप्रकारे अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय रेल्वेनेदेखील अतिरिक्त कोच तात्काळ प्रभावाने जोडले जात आहेत. आयआरसीटीसीवर अजूनही जागा उपलब्ध आहेत.(IndiGo)
एअरलाइन्स पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (एएलपीए) ने डीजीसीएच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. सुरक्षा नियमांमधील हलगर्जीपणा धोकादायक उदाहरण निर्माण करू शकतो. देशाच्या हवाई वाहतुकीच इंडिगोचा वाटा ६३% आहे आणि अशा मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी खोळंबले आहेत. या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ झाला.
DGCA चा FDTL नवीन नियम सर्वांना लागू, मग Indigo वर सर्वाधिक परिणाम का? जाणून घ्या कारण
केंद्र सरकारने इंडिगो व्यवस्थापनाला प्रवाशांना तात्काळ पैसे परत करण्याचे आणि भविष्यात असे व्यत्यय येऊ नयेत यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. सततच्या गोंधळानंतर, इंडिगोचे विमान वाहतूक हळूहळू सामान्य होत आहे, परंतु पूर्णपणे परत येण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात.