Indore 24 transgender attempt to suicide by drinking Phenyl madhya pradesh crime news
MP Crime Case: मध्य प्रदेश : इंदौरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच घरामध्ये स्वतःला बंद करत 24 तृतीयपंथींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. इंदूरमध्ये २४ ट्रान्सजेंडर लोकांनी फिनाइल प्यायल्याची घटना घडली आहे. या मागील गंभीर आणि धक्कादायक कारण समोर आले आहे. ही घटना पायल गुरु आणि सपना हाजी गटांमधील दीर्घकाळ चाललेल्या वादाचा परिणाम असल्याचे देखील समोर आले आङबे. यामधून ट्रान्सजेंडर व्यक्तीवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग देखील केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नंदलालपुरा आणि एमआर-१० भागात ट्रान्सजेंडर गटांमध्ये (पायल गुरु आणि सपना हाजी) दीर्घकाळापासून वाद सुरू होता. पंढरीनाथ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कथित पत्रकार पंकज आणि त्याचा सहकारी अक्षय यांनी या वादाचा फायदा घेत एका गटाशी संपर्क साधला. त्यांनी पत्रकार असल्याचे सांगून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली आणि पैसे मागितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा पंकजने एका ट्रान्सजेंडर महिलेला जबरदस्तीने एका इमारतीत नेले आणि तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. जर तिने पोलिसात तक्रार केली तर तिच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्याने दिली. या छळाला कंटाळून, एका गटातील दोन डझन म्हणजे 24 ट्रान्सजेंडर महिलांनी फिनाइल पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा इतर ट्रान्सजेंडर लोक परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात ही बाब आली आणि एकच गोंधळ उडाला. पोलीस देखील घटनास्थळी ताबडतोब पोहोचले, त्यांनी दरवाजा तोडला आणि सर्वांना ऑटो, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या वाहनांमधून सर्वांना एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता रुग्णालयामध्ये सर्वांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृती बिघडल्याचे ऐकताच, इतर ट्रान्सजेंडर लोक जवाहर मार्गावर झोपले, रस्ता अडवला आणि सपना हाजीविरुद्ध घोषणाबाजी केली. यामुळे इंदौरमधील वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी वकीलांचे प्रेमप्रदर्शन
दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये चालू सुनावणीमध्ये एका वकिलाने महिलेला चुंबन घेतले. या ऑनलाईन सुनावणीवेळी कॅमेरा चालू ठेवत चुंबन घेतले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र रोष व्यत्त केला जात असून वकीलाच्या वर्तनामुळे संताप व्यक्त होत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या ऑनलाईन सुनावणीवेळी हा धक्कादायक प्रकार घडला. सुनावणी सुरु होणार असताना हा वकील सुनावणीकडे कोणतेही लक्ष देत नव्हता. यावेळी त्यांने महिलेचे चुंबन घेतले. याचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला. या घटनेमुळे वकीलाच्या व्यावसायिक वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना एका खटल्याच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान घडली आहे, जी न्यायालयीन प्रोटोकॉलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालविली जात होती.