Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज निर्मितीचा संशय; विशेष पथकाची धडक कारवाई

एम. डी. ड्रग्ज अमली पदार्थ तयार करणारी गुप्त फॅक्टरी कार्यरत असल्याच्या संशयावरून विशेष पथकाने कराड तालुक्यात मोठी कारवाई केली आहे

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2026 | 04:31 PM
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज निर्मितीचा संशय; विशेष पथकाची धडक कारवाई

कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज निर्मितीचा संशय; विशेष पथकाची धडक कारवाई

Follow Us
Close
Follow Us:
  • कराड तालुक्यात ड्रग्ज निर्मितीचा संशय
  • विशेष पथकाची धडक कारवाई
  • रेकॉर्डवरील जुन्या गुन्हेगाराचा सहभाग
कराड/राजेंद्र मोहिते : कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळसण (पाचुपतेवाडी) परिसरात एम. डी. ड्रग्ज अमली पदार्थ तयार करणारी गुप्त फॅक्टरी कार्यरत असल्याच्या संशयावरून जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाने मोठी कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एका जुन्या गुन्हेगाराचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित संशयिताने बिहारमधील काही व्यक्तींना हाताशी धरून तालुक्याच्या ग्रामीण भागातील तुळसण (पाचुपतेवाडी) परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने अमली पदार्थांची निर्मिती सुरू केली होती. फॅक्टरीचे ठिकाण, हालचाली आणि संपर्क याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याने ही बाब दीर्घकाळ कोणाच्या लक्षात आली नव्हती. मात्र, जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाला याबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अचानक छापा टाकत कारवाई केली. ही कारवाई पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली असून, स्थानिक पोलिसांना याची पूर्वकल्पना नव्हती, हे विशेष बाब म्हणून पुढे येत आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या नेटवर्कमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. काही महिन्यांपूर्वी कराड शहरातील एका नामवंत मद्य व्यावसायिकाच्या मुलाचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध उघडकीस आला होता. त्या घटनेशी सदर प्रकरणाचा काही संबंध आहे का?, याचीही तपास यंत्रणा पडताळणी करत आहे.

या कारवाईमुळे कराड तालुक्यात पुन्हा एकदा एम. डी. ड्रग्जसारख्या घातक अमली पदार्थांचा काळाबाजार सक्रिय असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी व्याप्ती आणि जबाबदार व्यक्ती स्पष्ट होतील, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा : पत्नीवर संशय, काठीने केली बेदम मारहाण; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव

ड्रग्ज रॅकेटला जोरदार दणका

शिरूरसारख्या शहरातून देशभरात पसरलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पुण्यासह जिल्ह्यात देखील या ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे रोवली गेल्याचे वास्तव समोर आले आहे. पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज उघडकीस आल्यानंतर जोरदार कारवाई करत ड्रग्जची साखळी मोडत एजंटना दणका दिला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पुणे पोलिसांनी सर्वाधिक कारवाया करत तब्बल ३१९ जणांना अटक केली आहे. तर २०१५ गुन्हे नोंदवले आहेत. तुलनेने ड्रग्जचा साठा आकडेवारीत कमी असला तरी पाळेमुळे खोदण्यात पोलिस यशस्वी झाल्याचे दिसत आहे. यासोबतच आता पुणे ग्रामीण पोलिसांना देखील पसरलेली ही साखळी मोडीत काढावी लागणार आहे.

Web Title: Special team has taken major action due to suspicion of drug manufacturing in karad taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Karad Crime

संबंधित बातम्या

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल
1

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

रुममेटच निघाली सूत्रधार; तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले अन् थेट स्नॅपचॅटवर टाकले
2

रुममेटच निघाली सूत्रधार; तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले अन् थेट स्नॅपचॅटवर टाकले

दोस्तीत कुस्ती! मित्राने केला साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून; कारण काय तर…
3

दोस्तीत कुस्ती! मित्राने केला साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून; कारण काय तर…

पैठण खुले कारागृहात कैद्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
4

पैठण खुले कारागृहात कैद्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.