RSS-BJP Dispute: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्याबाबत अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत संघ आणि भाजपमध्ये एकमत होत नसल्याचे बोलले जात आहे. आता या सर्व राजकीय उलटसुलट चर्चांबाबत संघाने एक निवेदन जारी केले आहे. या चर्चा केवळ अफवा असल्याचे आरएसएस नेते राम माधव यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राम माधव यांनी आरएसएस आणि भाजपमधील संबंधांवर भाष्य केलं आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) एकाच वैचारिक कुटुंबाचा भाग आहेत आणि दोघांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत.दोन्ही संघटना राजकारण आणि समाजसेवेच्या त्यांच्या संबंधित क्षेत्रात काम करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आरएसएसच्या १०० वर्षांच्या इतिहासाचा उल्लेख केल्याने राम माधव यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले. राम माधव म्हणाले की, ‘ वेळोवेळी वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. पण त्यांना त्यांना कोणताही मुद्दा सापडला नाही, तर आरएसएसला पुढे आणतात आणि आरएसएस आणि भाजपमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा करतात.
भारतीय जनता पक्षाने आपल्या नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली आहे. परंतु राष्ट्रीय अध्यक्षाची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदावरून भाजप आणि आरएसएसमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याशिवाय, अलिकडेच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राजकारणात सुमारे ७५ वर्षांनंतर निृवृत्तीचा उल्लेख करत अप्रत्यक्ष पंतप्रधान मोदींनाच इशारा दिल्याच्याही चर्चा सुरू झाल्या, त्यामुळे आरएसएस आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचे बोलले जाऊ लागले. पण आरएसएसने या बातम्या केवळ अफवा असल्याचे सांगत विरोधकांचे दावे फेटाळून लावले.
Asia cup 2025 : T20 सामन्यांमध्ये कुणाची दहशत? शुभमन गिल की संजू सॅमसन? जाणून घ्या २१ सामन्यांचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आरएसएसचे कौतुक केले होते. याबद्दल राम माधव म्हणाले की, पंतप्रधानांच्या या संदेशामुळे कामगारांना चांगला संदेश मिळाला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी आरएसएसच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त याचा उल्लेख केला आणि संघटनेने देशासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि स्वयंसेवक हे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत असेही म्हटले.