Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh News: एखादी बकरी मुलासारखी वाढवली जाते आणि….; म्हणून त्याने बकरीऐवजी स्वतःचे बलिदान दिले

प्राथमिक तपासात ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले असून, घटनेच्या इतर शक्यतेचाही तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून, अधिकृतरित्या पंचनामा आणि अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Jun 08, 2025 | 09:57 AM
Uttar Pradesh News: एखादी बकरी मुलासारखी वाढवली जाते आणि….; म्हणून त्याने बकरीऐवजी स्वतःचे बलिदान दिले
Follow Us
Close
Follow Us:

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील उधोपूर गावात बकरी ईदच्या दिवशी घडलेली एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. ६० वर्षीय ईश मोहम्मद नावाच्या व्यक्तीने बकरीची कुर्बानी देण्याऐवजी स्वतःचाच गळा चिरून बलिदान दिले. गंभीर अवस्थेत त्याला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Crime News: रांजणगाव गणपतीतील ‘या’ तिहेरी हत्याकांडाचा उलगडा; पोलिसांनी शर्थीने आरोपीला थोकल्या

ही घटना देवरियाच्या गौरी बाजार पोलीस ठाणे हद्दीत घडली. ईश मोहम्मद यांनी ईद-उल-अजहाची नमाज अदा केल्यानंतर घरी येऊन घराबाहेरच्या झोपडीत स्वतःचा गळा चिरला. ते सुमारे एक तास झोपडीत वेदनांत तडफडत होते. त्यांचा आक्रोश ऐकून कुटुंबीयांनी धाव घेतली आणि तात्काळ रुग्णालयात नेले. सुरुवातीला त्यांना देवरिया मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, पण प्रकृती गंभीर असल्याने पुढे त्यांना गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ईश मोहम्मद यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी नमूद केले की, “एखादा बकरी घरात मुलासारखी वाढवून तिची कुर्बानी दिली जाते. तीही एक जीव आहे. म्हणून मी स्वतःचे बलिदान देत आहे. मला कोणीही मारलेले नाही. माझ्या कबरीसाठी मी एक खांब लावलेला आहे, तिथेच मला दफन करा. शांततेत अंत्यसंस्कार करा. कोणाचीही भीती बाळगू नका.”

आता पेट्रोल-डिझेलच्या झंझटीला राम राम करा ! फक्त 10 लाखांच्या बजेटमध्ये मिळताय ‘या’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार

या घटनेबाबत माहिती देताना देवरियाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद कुमार वर्मा यांनी सांगितले की, यूपी ११२ वर मिळालेल्या फोनवरून गौरी बाजार परिसरात एका इसमाने गळा कापल्याची माहिती मिळाली. पोलिसांची पीआरव्ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी इसमाला उपचारासाठी पाठवण्यात आले. प्राथमिक तपासात ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले असून, घटनेच्या इतर शक्यतेचाही तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून, अधिकृतरित्या पंचनामा आणि अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

Web Title: Ish mohammad from uttar pradesh sacrificed himself instead of a goat on the day of bakri eid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • uttarpradesh news

संबंधित बातम्या

Bakri Eid 2026: बकरी ईद कशी साजरी करायची? सरकारची नवी गाइडलाइन जारी; नियम मोडल्यास थेट जेलची कारवाई
1

Bakri Eid 2026: बकरी ईद कशी साजरी करायची? सरकारची नवी गाइडलाइन जारी; नियम मोडल्यास थेट जेलची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.