फोटो सौजन्य: iStock
वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे ग्राहक इलेक्ट्रिक कार्सना जास्त प्राधान्य देत आहे. यामुळे भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत जोरदार वाढ होते आहे. हीच वाढती मागणी अनेक कार उत्पादक कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनं उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. यामुळे बाजारात अनेक उत्तम फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार दाखल होत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषण नियंत्रण नियमांच्या कठोर मानकांमुळे सामान्य भारतीय ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. जर तुम्ही सुद्धा 5 ते 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला काही बेस्ट आणि बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊयात.
TVS कडून 450cc इंजिन असणाऱ्या बाईकवर काम सुरु, केव्हा होईल लाँच?
एमजी कॉमेट ईव्ही ही भारतातील सर्वात किफायतशीर आणि सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे, परंतु BaaS योजनेअंतर्गत ती 5 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत देखील खरेदी करता येते. यात 17.3 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे, जी 230 किमीची रेंज देते. चार्जिंगसाठी, 3.3 किलोवॅट एसी चार्जरसह ही कार 7 तासांत पूर्णपणे चार्ज होते, तर डीसी फास्ट चार्जरसह 5.5 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होते.
या कारमध्ये दोन 10.25-इंच स्क्रीन (इन्फोटेनमेंट आणि ड्रायव्हर डिस्प्ले), एलईडी लाईट्स आणि वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो यांचा समावेश आहे. ही कार विशेषतः शहरांमध्ये ट्रॅफिक आणि पार्किंगच्या समस्यांना तोंड देणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे.
टाटा टियागो ईव्ही ही परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेसाठी परिपूर्ण कार आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे. ही कार दोन बॅटरी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे – 19.2 किलोवॅट प्रति तास जी 250 किमीची रेंज देते आणि 24 किलोवॅट प्रति तास जी 350 किमी पर्यंत धावू शकते. यात 74 बीएचपी पॉवर आणि 170 एनएम टॉर्क मिळते. डीसी फास्ट चार्जिंगसह, ही कार फक्त 58 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते.
टाटा मोटर्सकडून मान्सून चेक-अप कॅम्प सुरु, ग्राहकांना फ्रीमध्ये मिळणार ‘हे’ फायदे
या कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन, 8-स्पीकर हरमन साउंड सिस्टम आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांचा समावेश आहे. तसेच, 4-स्टार जीएनसीएपी सेफ्टी रेटिंगमुळे ती एक सुरक्षित फॅमिली कार बनते.
टाटा पंच ईव्ही ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही मानली जाते, ज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यात 25 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे जी 315 किमी पर्यंतची रेंज देते आणि डीसी फास्ट चार्जरने ती फक्त 56 मिनिटांत 0 ते 80% पर्यंत चार्ज करता येते. यात 10.25-इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, 350 लिटर बूट स्पेस आणि अन्य फीचर्स आहे. तसेच या कारला 5-स्टार सेफ्टी रेटिंग सुद्धा मिळाली आहे.