Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नौदल अधिकाऱ्याच्या त्या विधवा पत्नीला काय उत्तर देऊ’; उमर अब्दुल्लांच अधिवेशनात मन हेलावून टाकणारं भाषण

दशहतवादाचा त्याचं वेळी नायनाट होईल,  ज्यावेळी  लोक आमच्या सोबत उभे राहतील आणि आज मला जाणवतंय की लोक आमच्यासोबत आहेत, असं  मत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 28, 2025 | 03:22 PM
'बंदुकीच्या जोरावर दहशतवादाचा अंत होणार नाही, तर...'; उमर अब्दुल्लांच मन हेलावून टाकणारं भाषण

'बंदुकीच्या जोरावर दहशतवादाचा अंत होणार नाही, तर...'; उमर अब्दुल्लांच मन हेलावून टाकणारं भाषण

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी विशेष अधिवेशनात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. “आपण बंदुकीच्या जोरावर दहशतवाद नियंत्रित करू शकतो, पण त्याचा पूर्णतः नायनाट करू शकत नाही. दशहतवादाचा त्याचं वेळी नायनाट होईल,  ज्यावेळी लोक आमच्या सोबत उभे राहतील आणि मला जाणवतंय की लोक आज आमच्यासोबत आहेत, असं  मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Pahalgam Terror  Attack: दिल्लीत खलबतं; नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह अनिल चौहान यांच्यात बंद दाराआड चर्चा

उमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, “उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम, अरुणाचल पासून गुजरात, जम्मू-काश्मीर, केरळ  संपूर्ण देश या हल्ल्याने हादरला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हा पहिलाच हल्ला नाही, पण एक काळ असा होता की हे हल्ले थांबले होते. आता २१ वर्षांनी पहलगाममध्ये पुन्हा इतका मोठा हल्ला झाला आहे.”

#WATCH | Jammu: J&K CM Omar Abdullah says, “Militancy and terrorism will end when people will support us. This is the beginning of that… We should not say or show anything which harms this movement that has arisen… We can control militancy using guns, it will end only when… pic.twitter.com/cWmsUY9uQL — ANI (@ANI) April 28, 2025

“जम्मू-काश्मीरची सुरक्षा राज्य सरकारची नाही, तहीही…”

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, ” जम्मू काश्मीरमध्ये जे हल्ले झाले ते इतिहास जमा झाले आहेत. असं वाटत होतं.  पण दुर्दैवाने, पहलगाममधील या हल्ल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. २६ लोकांना श्रद्धांजली अर्पण करताना माझ्याकडे बोलण्साठी शब्द नाहीत. जम्मू-काश्मीरची सुरक्षा ही इथल्या लोकांच्या निवडून आलेल्या सरकारची जबाबदारी नाही, हे माहिती असूनही, त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागायची आहे”

ते पुढे म्हणाले, “पर्यटन मंत्री म्हणून मी या लोकांना आमंत्रित केलं होतं की तुम्ही जम्मू-काश्मीरला या, पण मी त्यांना परत सुखरूप पाठवू शकलो नाही. मी त्यांची माफीही मागू शकलो नाही. मी त्यांना काय सांगू, ज्यांनी आपल्या वडिलांना रक्ताने माखलेलं पाहिलं. त्या नेव्ही ऑफिसरच्या विधवेचं काय, जिचं लग्न नुकतंच झालं होतं, अशा उद्विग्न भावना त्यांनी सभागृहात व्यक्त केल्या.

#PahalgamTerrorAttack | J&K CM Omar Abdullah says, “I will not use this moment to demand statehood. After Pahalgam, with what face can I ask for statehood for Jammu and Kashmir? Meri kya itni sasti siyasat hai? We have talked about statehood in the past and will do so in the… pic.twitter.com/kZqXSRxLmY — ANI (@ANI) April 28, 2025

“हा हल्ला आम्हाला आतून पोखरून गेला”

“लोकांनी मला विचारलं की आमचं काय चुकलं? आम्ही फक्त सुट्टी घालवायला आलो होतो, पण आता आयुष्यभर आम्हाला या पहलगाम हल्ल्याची किंमत मोजावी लागेल. जे लोक हे करत आहेत, ते म्हणतात की हे तुमच्या भल्यासाठी आहे – पण आम्ही असं कधी म्हणालो का? ही आमची परवानगी होती का? आमच्यातला कुणीही या दहशतवादी हल्ल्याच्या बाजूने नाही. या हल्ल्याने आम्हाला आतून पोखरून टाकलं आहे.”

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं नक्षल ऑपरेशन, 500 पेक्षा जास्त नक्षलवादी चक्रव्यूहात अडकले

ते पुढे म्हणाले, “अशा परिस्थितीत आशेचा किरण शोधणं खूप कठीण आहे. गेल्या २६ वर्षांत पहिल्यांदाच मी लोकांना अशा पद्धतीने रस्त्यावर उतरलेलं पाहिलं आहे. कदाचित असं एकही गाव नसेल जिथं या हल्ल्याचा निषेध झालेला नाही. दहशतवादाचा नायनाट तेव्हाच होईल जेव्हा लोक आमच्यासोबत उभे राहतील. जामिया मशिदीत या हल्ल्यानंतर २ मिनिटांची शांतता पाळण्यात आली, आणि त्या शांततेचा अर्थ आम्हाला माहीत आहे.”

#WATCH | Jammu: J&K CM Omar Abdullah says, “Neither of us supports this attack. This attack has hollowed us. We are trying to find a ray of light in this… In the last 26 years, I have never seen people come out to protest against an attack like this…” pic.twitter.com/gMUYu7x4z1 — ANI (@ANI) April 28, 2025

“जम्मू-काश्मीरचा रहिवासी आदिल, ज्याने पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव गमावला, त्याचा उल्लेख मी इथे करू इच्छितो. जम्मू-काश्मीरची सुरक्षा ही निवडून आलेल्या सरकारची जबाबदारी नाही, पण मी हा प्रसंग राज्याच्या दर्जासाठी मागणी करण्यासाठी वापरणार नाही. राज्याच्या दर्जाची मागणी आम्ही योग्य वेळी करू, पण आत्ता तो काळ नाही. सध्या आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि पीडित कुटुंबांच्या सोबत आहोत, अशा भावना त्यांनी यावेळी  व्यक्त केल्या. त्यांचं भाषण ऐकताना अख्ख सभागृह स्तब्ध झालं होतं.

Web Title: Jammu kashmir cm omar abdullah speech on pahalgam attack said weapons will not control terrorism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • Jammu Kashmir News
  • Pahalgam Terror Attack
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Sydney Fireworks: सिडनीचा शांतता संदेश; Bondi हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आकाशात होणार जगातील सर्वात मोठी आतिषबाजी
1

Sydney Fireworks: सिडनीचा शांतता संदेश; Bondi हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आकाशात होणार जगातील सर्वात मोठी आतिषबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.