Photo Credit- Social Media नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह अनिल चौहान यांच्यात बंद दाराआड चर्चा...; दिल्लीत ठरलं पाकिस्तानचं भविष्य?
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात भारत-पाकिस्तान युद्धाचे वारे वाहू लागले आहेत. राजधानी नवी दिल्लीत केंद्र सरकारकडून सातत्याने बैठका सुरू आहेत. अशातच या संदर्भात दिल्लीतून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन दिवसात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चा माहित आहे. विशेष म्हणजे राजनाथ सिंह आणि सीडीएस यांच्यात ३० मि. पहिली बैठक आणि राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्यात ३० दुसरी बैठक झाली आहे. या दोन्ही बैठकींमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांनी रविवारी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दोघांमध्ये ३० मिनिटे बंद दाराआड भेट झाली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान यांनी राजनाथ सिंहांना पहलगाममधील परिस्थितीचा आढावा दिला. तसेच सीडीएस चौहान यांनी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. पण, सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. भारतात, संरक्षण प्रमुखांना तिन्ही दलांचे समन्वयक म्हटले जाते. अशा परिस्थितीत राजनाथ सिंह आणि सीडीएस चौहान यांच्यातील ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सीडीएस अनिल चौहान यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज सकाळी मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेटण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान निवासस्थानी राजनाथ आणि मोदी यांच्यात सुमारे 30 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत फक्त पाकिस्तानबद्दलच चर्चा झाली. मोदी आणि राजनाथ यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु ही भेट फक्त पाकिस्तानच्या मुद्द्यावरच झाल्याचे सांगितले जात आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भारताच्या तयारीबद्दल एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार, सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारला युद्ध नकोय पण त्याचे लक्ष फक्त दहशतवादावर संपण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. जरी भारताने हल्ला केला तरी ते फक्त पाकव्याप्त काश्मीरपर्यंतच हल्ला करू शकते. २०१६ आणि २०१९ मध्ये भारताने पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले. हल्ल्याची भीती पाकिस्तानलाही सतावत आहे. पाकिस्तानने पीओके क्षेत्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. यासोबतच कराचीसारख्या शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.