crime (फोटो सौजन्य- social media)
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात छत्तीसगड – तेलंगणाच्या सीमेवर नक्षलवाद विरोधात सर्वात मोठं ऑपरेशन राबवलं जात आहे. करेगुट्टाच्या डोंगराळ भागात सीआरपीएफ, छत्तीसगड पोलीसांचे STF आणि DRG तसेच तेलंगाना पोलिसांच्या ग्रे हाऊंड्स तुकड्यांतील एकूण ७००० पेक्षा जास्त जवानांनी ५०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना गेल्या सहा दिवसांपासून घेरून ठेवले आहे.
‘तो नाही तर हा’ म्हणत नागपूरच्या सोशा रेस्टॉरंटच्या मालकाची गोळ्या झाडून हत्या; आठ आरोपी अटकेत
करेगुट्टाच्या डोंगराळ भागात सर्वात जास्त धोकादायक मानला जाणारा आणि सहा कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षल कमांडर ‘मडावी हिडमा’ नक्षलवाद्यांच्या बटालियन १ सह घेरला गेला आहे. त्याच्यासोबत बटालियन 1 चा कमांडर ‘देवा बरसे सुक्का’ आणि नक्षलवाद्यांसाठी शस्त्रांसह सर्व आवश्यक वस्तूंची सप्लाय चेन सतत कायम ठेवणारा ‘दामोदर’ देखील सुरक्षा दलांच्या चक्रव्ह्यहात अडकला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या विरोधातला देशातील आजवरचा सर्वात मोठा ऑपरेशन असल्याचं म्हंटल जात आहे.
सुरक्षा दलांनी कोणा- कोणाला घेरलं?
माडवी हिडमा: देशाच्या नक्षल इतिहासात सर्वात जास्त क्रूर आणि धोकादायक नक्षल कमांडर मानला जाणारा माडवी हिडमा आहे. तो करेगुट्टाच्या डोंगरावर घेरला गेल्याची माहिती आहे. अनेक वर्ष नक्षलवाद यांच्या सर्वात घटक मानल्या जाणाऱ्या बटालियन १चा नेतृत्व मडावी हिडमा ने केला आहे. यांनी सुरक्षा दलांना सर्वाधिक नुकसान पोहोचवले आहे.
६ एप्रिल २०१० रोजी देशातील सर्वात मोठ्या नक्षलवादी हल्ल्यात माडवी हिडमाच्या नेतृत्वात नक्षलवादी बटालियन १ ने सीआरपीएफच्या ७६ जवानांना मारले होते. २०१३ मध्ये सुकमा मधील झिरम घाटी मध्ये काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लीच नेतृत्व माडवी हिडमानेच केला होता. २०१७ मध्ये मध्ये भेज्जी या ठिकाणी सीआरपीएफच्या 12 जवानांचा मृत्यू झाला होता. यासाठी हिडमा जबाबदार होता. २०१७ मध्ये बुरकापालला २५ पोलिसांचा मृत्यू हिडमाच्या बटालियन १ च्या हल्ल्यात झाला होता. आणि ४ एप्रिल २०२१ रोजी टिकुलगुडामध्ये हेडमाच्या नेतृत्वात नक्षलवाद्यांनी २३ सीआरपीएफ जवानांची हत्या केली होती.
गेल्या वर्षी हिडमाला पदोन्नती मिळून तो नक्षलवाद्यांच्या निर्णय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य झाला.हिडमा किती धोकादायक नक्षल कमांडर आहे याचा अंदाज आलाच असेल. त्याच्या अटकेसाठी छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड आणि महाराष्ट्रात मिळून त्याच्यावर एकूण सहा कोटींचे बक्षीस आहेत.
देवा बरसे सुक्का : देवा बरसे सुक्का हा हिडमानंतर बटालियन एकचा कारभार सांभाळत आहे. हिडमाच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षात झालेल्या प्रत्येक हल्ल्यात देवाही त्याच्यासोबत होता. तो सुद्धा करेगुट्टाच्या डोंगळावर सुरक्षा दलांच्या चक्रव्यूहात अडकला आहे.
दामोदर: अबुझमाड या नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात नक्षलवाद्यांना सातत्याने शस्त्रसाठा मिळत रहावं, त्यांची रेशन, औषध, संगणक मोबाईल, अशी सप्लाई लाईन सतत कायम राहावी यासाठी काम करतो. तो देखील करेगुट्टाच्या डोंगरावर अडकल्याची माहिती आहे.
करेगुट्टा डोंगर भौगोलिक दृष्ट्या कसा?
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या दक्षिणे टोकावर ‘करेगुट्टा’ डोंगर छत्तीसगड व तेलंगणाच्या सीमेवर आहे. करेगुट्टा डोंगर आणि तिथला घनदाट जंगल तब्बल 145 वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. डोंगराचा 70 टक्के भाग छत्तीसगडमध्ये तर 30 टक्के भाग तेलंगणात येतो. उभ्या उंचीच्या या डोंगरावर खालून चढून जाणं आणि उंचावर सुरक्षित ठिकाणी बसलेल्या नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन राबवण सुरक्षा दलांसाठी सोपं नाही.
गेले पाच दिवस 44 – 45 अंश सेल्सिअस तापमानामध्ये या ठिकाणी हजारोंच्या संख्येने सुरक्षा दल असतानाही मोठ्या संख्येने जवान रोज डिहाइड्रेट होत आहे. अनेक किलोमीटर पर्यंत निर्मनुष्य असलेल्या या भागात हेलिकॉप्टरच्या मदतीने 7000 पेक्षा जास्त जवानांसाठी रोज रेशन, पाणी व औषधी पोहोचवल्या जात आहेत. नक्षलवाद्यांनी डोंगराच्या चारही बाजूंना तसेच डोंगर वर येणाऱ्या मार्गावर मोठ्या संख्येने भूसुरुंग पेरून सुरक्षा दलांची वाट विकट केली आहे. मात्र असे असले तरी सुरक्षा दल या ठिकाणी नक्षलवादाविरोधातल्या निर्णायक लढ्याच्या इच्छेने गेले सहा दिवस खम ठोकून उभे आहेत. अधून-मधून गोळीबार सुरु आहे.
जर या ऑपरेशनच्या माध्यमातून सुरक्षा दल हिडमा आणि देवाला नामोहरम करण्यात किंवा अटक करण्यात यशस्वी ठरले, तर फक्त छत्तीसगडच नाही तर भारतातील नक्षलवादावर सुरक्षा दलांचे हे आजवरचा सर्वात मोठा आघात मानला जाईल. हा ऑपेरेशन देशातील इतिहासातला सर्वात मोठा नक्षल ऑपरेशन असणार आहे..
Bhandara Accident News: मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा घटनास्थळीच मृत्यू