Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu Kashmir : पुंछमध्ये LOC जवळ लँडमाइनचा थरार; लष्कराने वेळीच केला स्फोटकाचा नायनाट

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लाइन ऑफ कंट्रोल जवळ गस्तीच्या वेळी लँडमाइन आढळल्याने सुरक्षा यंत्रणेत सतर्कता वाढली आहे. भारतीय लष्कराच्या बॉम्ब डिस्पोजल पथकाने ही लँडमाइन सुरक्षितपणे नष्ट केले असून स्थानिग नागरिकांना संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचे आवाहन केले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 08, 2026 | 05:11 PM
Jammu Kashmir : पुंछमध्ये LOC जवळ लँडमाइनचा थरार; लष्कराने वेळीच केला स्फोटकाचा नायनाट

Jammu Kashmir : पुंछमध्ये LOC जवळ लँडमाइनचा थरार; लष्कराने वेळीच केला स्फोटकाचा नायनाट

Follow Us
Follow Us:
  • LOC जवळ लँडमाइन आढळली
  • पावसामुळे लँडमाइन वाहून जाण्याचा धोका
  • संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचे आवाहन
 

जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)च्या पुंछ जिल्ह्यातील मेंढर सब-डिव्हिजनमध्ये लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ गस्तीच्या वेळी लँडमाइन आढळल्याने सुरक्षा यंत्रणेत सतर्कता वाढली. भारतीय लष्कराच्या बॉम्ब डिस्पोजल पथकाने ही लँडमाइन सुरक्षितपणे नष्ट केली.

बालाकोटच्या फॉरवर्ड भागात नियमित गस्त सुरू असताना लष्कराच्या जवानांना लँडमाइन आढळली. त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल पथकाला तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. पथकाने कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान होऊ न देता लँडमाइन नष्ट केली.

घुसखोरी रोखण्यासाठी केला जातो लँडमाइनचा वापर

LOC लगतच्या भागात घुसखोरी रोखण्यासाठी विविध ठिकाणी लँडमाइनचा वापर केला जातो. मात्र, मुसळधार पाऊस आणि हंगामी पुरामुळे काही वेळा या लँडमाइन आपल्या मूळ ठिकाणाहून वाहून जातात. त्यामुळे सुरक्षा दलांकडून अशा स्फोटकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे नष्ट केले जाते.

यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी मेंढर सेक्टरमधील बसूनी टॉप येथे बॉर्डर फेन्सजवळ दोन लँडमाइन आढळल्या होत्या. बॉम्ब डिस्पोजल पथकाने दोन्ही स्फोटके नियंत्रित स्फोटाद्वारे सुरक्षितपणे नष्ट केली होती.

पावसामुळे किंवा पुरामुळे स्थान बदललेल्या लँडमाइनमुळे सुरक्षा जवानांसह सीमावर्ती भागातील नागरिकांनाही धोका निर्माण होऊ शकतो. डोंगराळ भागात जंगलातील आगीमुळे जुन्या किंवा स्थान बदललेल्या लँडमाइनचा अचानक स्फोट होण्याची शक्यताही असते.

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचे आवाहन

दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना, विशेषतः शेतकरी आणि गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या मुलांना, अनोळखी किंवा संशयास्पद वस्तूंपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. कोणतीही धातूची किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास तिला स्पर्श करू नये किंवा हलवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी वस्तू आढळल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या सुरक्षा चौकी किंवा पोलिसांना माहिती द्यावी. त्यानंतर प्रशिक्षित पथकाकडून त्या वस्तूची तपासणी करून आवश्यक कारवाई केली जाते. सीमेवरील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर ठेवण्यात आली असून, ड्रोनच्या माध्यमातून निगराणी आणि जंगलातील गस्तही वाढवण्यात आली आहे.

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर

Web Title: Jammu kashmir poonch loc landmine found army destroyed safely rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • army
  • Bomb Blast
  • line of control

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.