धनबाद: झारखंडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. झारखंड राज्यातील धनबाद येथील एका कोळसा खाणीत मोठा अपघात घडला आहे. या घटनेत ९ कामगारांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमध्ये जिल्ह्यातील धनबाद येथीलकेशवगड येथे एक अवैध कोळसा सुरु असल्याचे समोर आले आहे. या खाणीत आज मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये ९ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य वेगाने केले जात आहे.
ही घटना वाघमारा क्षेत्राच्या अंतर्गत घडली आहे. या ठिकाणी एक अवैधरित्या कोळसा खाण चालवली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. अजूनही बचावकार्य सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही कामगार अडकले असल्याचे समजते आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. स्थानिक आमदार शरयू राय यांनी घटनेची माहिती एसएसपी यांना दिली. त्यानंतर प्रशासन घटनास्थळी आले आणि बचावकार्य सुरु करण्यात आले.
आमदार शरयू राय यांचा आरोप काय?
धनबाद येथील जमुनिया भागात एक अवैध कोळसा खाण कोसळल्याने ९ कामगारांचा मृत्यू झाला आहे. अवैध खाण माफिया मृतदेहांची विल्हेवाट लावण्यचा प्रयत्न करत आहेत. मी धनबादच्या एसएसपी यांना सूचना केल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चुनचुन नावाचा एक खाण माफिया व्यक्ती प्रभावशाली संरक्षणाखाली अवैध खाण चालवत आहे.
बाघमारा,धनबाद के जमुनिया नामक स्थान पर अवैध खनन की चाल धँसने से आज रात 9 मज़दूरों की मौत हो गई है.अवैध खनन माफिया मृतकों का शव निपटाने में लगे हैं.इसकी सूचना मैंने #ssp #धनबाद को दे दी है.प्रत्यक्षदर्शी के अनुसार चुनचुन नामक खनन माफिया प्रभावशाली संरक्षण में अवैध खनन करा रहा था.
— Saryu Roy (@roysaryu) July 22, 2025
हा घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बचावकार्य सुरु आहे. या परिसरात अवैधरित्या कोळसा उत्खनन हात असून, प्रसाशन हे रोखण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप केला जात आहे.
डोंबिवली MIDC तील कपड्याच्या कारखान्याला भीषण आग
डोंबिवलीच्या एमआयडीसी (MIDC) फेज वन परिसरातील ऐरोसेल गारमेंट कंपनीत आज (23 जुलै) दुपारच्या वेळेत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी परिसरातील गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली आहे.