बंगळुरू: काल कर्नाटकमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाचा विजयी सोहळा आयोजित करण्यात आला होता. चिन्नास्वामी स्टेडियम आणि विधान भवन या दोन्ही ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र चिन्नास्वामी स्टेडियामबाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जणांचा मृत्यू तर 56 पेक्षा अधिक जखमी झाल्याचे समजते आहे. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.
काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची कर्नाटक हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. आता या चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे होण्यासाठी सीआयडीअंतर्गत एसआयटी देखील स्थापन केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने हायकोर्टाला माहिती दिली आहे.
कर्नाटक सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. बंगळुरू शहर जिल्हा उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणाची चौकशी 15 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
‘आरसीबी’ आणि ‘डीएनए’ कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ
तब्बल 18 वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर बंगलोरमध्ये आरसीबीच्या संघाची विजयी रॅली काढण्यात आली होती. या विजयाच्या सोहळ्यात चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. तिथे झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आता त्यावरून कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. तिथे चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. त्यानंतर कर्नाटक हायकोर्टाने सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच आरसीबी, डीएनए, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि इतरांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आयरिसीबीचे टेंशन वाढले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अपघाताबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच ते म्हणाले की, क्रिकेट असोसिएशनने परिस्थिती हाताळायला हवी होती. स्टेडियममध्ये फक्त एक छोटासा गेट उघडा होता, जिथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. गर्दी वाढताच लोकांनी जबरदस्तीने दरवाजा तोडला, ज्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली.C