Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेहिशेबी संपत्तीचे प्रकरण; हायकोर्टाचा उपमुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा, CBI चौकशी रद्द करण्याचे आदेश

काही कालावधीने राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर राज्य सरकारने सीबीआयला दिलेली चौकशीची परवानगी परत घेतली. ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2024 | 08:42 PM
बेहिशेबी संपत्ती प्रकरण; हायकोर्टाचा उपमुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा, CBI चौकशी केली रद्द

बेहिशेबी संपत्ती प्रकरण; हायकोर्टाचा उपमुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा, CBI चौकशी केली रद्द

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डिके शिवकुमार यांना कर्नाटक हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना डिके शिवकुमार यांच्या सीबीआय चौकशीचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आता बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. या प्रकरणातील चौकशी चालू ठेवण्याची सीबीआयची याचिका फेटाळून लावली आहे.

कर्नाटक राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत डिके शिवकुमार यांची सीबीआय चौकशी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान याविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाने कॅबिनेटचा निर्णय कायम ठेवत सीबीआयची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१९ मध्ये बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना डिके शिवकुमार यांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला दिली होती. त्यानंतर २०२० मध्ये सीबीआयने भ्रष्टाचार कायद्यांतर्गत डिके शिवकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शिवकुमार यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा चुकीचा असल्याचे म्हणत हायकोर्टात तो रद्द करण्यासाठी धाव घेतली होती.

२०२३ मध्ये हायकोर्टाने सीबीआयच्या तपासावर अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर शिवकुमार यांनी राज्यसरकारचा निर्णय रद्द करण्यासाठी हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल केली होती. काही कालावधीने राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर राज्य सरकारने सीबीआयला दिलेली चौकशीची परवानगी परत घेतली. ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

सीबीआय आणि भाजप आमदार बसनगौडा पाटील यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर हायकोर्टात याची सुनावणी पार पडली व सीबीआय व राज्य सरकारमधील वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्यास सांगण्यात आले. दरम्यान आता हायकोर्टाने सीबीआय चौकशी रद्द केल्याने डिके शिवकुमार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(फोटो- ट्विटर)

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना देखील हायकोर्टाचा दिलासा

म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (MUDA) शी संबंधित कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात म्हैसूरच्या लोकायुक्त आणि बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधी न्यायालयात भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलासा दिला आहे. भ्रष्टाचार कायद्याविरोधी कायद्यांतर्गत सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटल्यांमधील न्यायालयीन कारवाईला पुढील आदेश येईपर्यंत हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

कर्नाटक हायकोर्टाने या प्रकरणाला २९ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत संबंधित कोर्टाने कोणतीही कारवाई करू नये असे हायकोर्टाने म्हटले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत अधिनियम १९८८ अंतर्गत कलम १७ ए आणि भारतीय नागरिक सुरक्षेच्या कलम २१८ अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्यांनी खटला दाखल केला आहे.

Web Title: Karnataka high court cancel cbi enquiry against dcm d k shivkumar case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 08:39 PM

Topics:  

  • CBI
  • dk shivkumar
  • Karnataka High Court

संबंधित बातम्या

Karnataka High Court on X: ‘भारतात काम करण्यासाठी कायद्याचे पालन करावेच लागेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ‘एक्स’ला दणका
1

Karnataka High Court on X: ‘भारतात काम करण्यासाठी कायद्याचे पालन करावेच लागेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ‘एक्स’ला दणका

२,७९६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार…! अनिल अंबानी आणि राणा कपूर यांच्या अडचणीत वाढ, CBI ने न्यायालयात दाखल केले आरोपपत्र
2

२,७९६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार…! अनिल अंबानी आणि राणा कपूर यांच्या अडचणीत वाढ, CBI ने न्यायालयात दाखल केले आरोपपत्र

Munawar Khan : मुन्नावर खान कोण आहे? सीबीआयने ‘रेड नोटीस’ जारी केली होती…, क्राईम कुंडली वाचून बसेल धक्का बसेल!
3

Munawar Khan : मुन्नावर खान कोण आहे? सीबीआयने ‘रेड नोटीस’ जारी केली होती…, क्राईम कुंडली वाचून बसेल धक्का बसेल!

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग बिलाला कोर्टात आव्हान, पण केंद्र सरकारनं ठणकावून सांगितलं की…
4

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग बिलाला कोर्टात आव्हान, पण केंद्र सरकारनं ठणकावून सांगितलं की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.