Kedarnath disaster 2013 missing people by DNA Matching Search Uttarakhand Marathi News
Kedarnath disaster 2013 : उत्तराखंड : हिंदूचे पवित्र स्थान असलेल्या केदारनाथमध्ये एक दशकापूर्वी निसर्गाचा भयानक कोप दिसून आला होता. 2013 मधील केदारनाथमध्ये झालेला जलप्रलय इतका भयानक होता की त्याचा विसर आजपर्यंत कोणाला झालेला नाही. या आपत्तीत हजारो लोकांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत. केदारनाथ आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख 12 वर्षांनंतरही एक गूढच राहिले आहे. आता हे गूढ उलखडण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
केदारनाथच्या प्रलयमधील सर्वात मोठे रहस्य आता उलघडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दुर्घटनेमधील 702 लोकांचे डीएनए नमुने अहवाल पोलिसांकडे असून त्यांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या दुर्घटनेमध्ये बेपत्ता असलेल्या लोकांच्या प्रियजनांची ओळख पटविण्यासाठी 6000 हून अधिक लोकांनी प्रयोगशाळेत त्यांचे डीएनए नमुने दिले. त्यापैकीही या ७०२ लोकांची ओळख पटू शकली नाही. अशा परिस्थितीत, त्यांच्या प्रियजनांसाठी या डीएनए नमुन्यांची प्रतीक्षा वाढली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केदारनाथ धाममध्ये 2013 मध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांच्या शरिराचे अवशेष शोधण्याची प्रक्रिया या वर्षी पुन्हा सुरू होऊ शकतो. केदारनाथ आपत्तीत बेपत्ता असलेल्या ३०७५ लोकांचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. यासाठी उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. केदारनाथ आपत्तीत बेपत्ता झालेल्या लोकांचे सांगाडे शोधून त्यांचे सन्मानाने अंत्यसंस्कार करावेत, असे आवाहन याचिकेत उत्तराखंड सरकारला करण्यात आले होते. सरकारने आतापर्यंत चार वेळा पथके पाठवली आहेत.
7 वर्षांनंतर 703 सांगाडे सापडले
2020 मध्ये शोध पथकाला चाट्टी आणि गोमुखी परिसरात 703 सांगाडे सापडले. तर 2014 मध्ये 21 आणि 2016 मध्ये 09 सांगाडे सापडले आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये 10 पथके विविध मार्गांवर शोधकार्यासाठी निघाली होती, परंतु त्यांनाही यश मिळाले नाही. त्याच वेळी, पूर्वी सापडलेल्या सांगाड्यांच्या डीएनए चाचणीद्वारे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या वर्षी पुन्हा शोध सुरू होईल
अशा परिस्थितीत, या वर्षी पुन्हा एकदा शोध पथक पाठवण्याची तयारी सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितले की, राज्य सरकार या वर्षीही शोध पथक पाठवण्याची तयारी करत आहे. आम्ही उच्च न्यायालयात अहवाल सादर करणार आहोत.
उत्तराखंड उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये आणि नंतर २०१९ मध्ये राज्याला ३०७५ बेपत्ता लोकांचे अवशेष शोधून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले होते. आदेशानंतर, केदारनाथच्या आसपासच्या पायवाटेवर सरकारने शोध पथके पाठवली.
७०२ मृत त्यांच्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. केदारनाथ आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या ७०२ लोकांची आजपर्यंत ओळख पटलेली नाही. या मृतांच्या डीएनए नमुन्यांचा अहवाल पोलिसांकडे आहे. परंतु आजपर्यंत या मृतांची ओळख पटलेली नाही. कारण डीएनए देणाऱ्या ६ हजार लोकांपैकी कोणाशीही त्यांची जुळणी झालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत ७०२ लोक त्यांच्या ओळखीची वाट पाहत आहेत.