Kedarnath Helicopter Crash: उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आज (15 जून) सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. केदारनाथ येथील गौरीकुंड परिसराजवळ हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व ७ जणांचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेनंतर एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्यास सुरूवात झाली आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. हेलिकॉप्टरच्या अवशेषांचे अवशेष घटनास्थळी विखुरलेले आहेत.
हेलिकॉप्टर क्रॅश झाले, धूर दिसू लागल्यानंतर गवत कापणाऱ्या महिलांनी स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या संपूर्ण घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.केदारनाथमध्ये कोसळलेले हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. ही संपूर्ण घटना पहाटे ५:३० च्या सुमारास घडली. या संपूर्ण अपघातात पायलटसह ५ प्रौढ मुले आणि लहान एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर हेलिकॉप्टरला आग लागली. स्थानिक लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि प्रशासनालाही कळवले.
SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेचा संघ चॅम्पियन झाल्यानंतर केशव महाराजच्या डोळ्यात अश्रू! म्हणाला – मी खूप
चारधाम यात्रेदरम्यान, प्रवासी त्रास टाळण्यासाठी आणि चढाई टाळण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात. अलिकडच्या काळात केदारनाथमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अलिकडेच एका हेलिकॉप्टरचे रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. याशिवाय, काही दिवसांपूर्वी आणखी एका हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यापूर्वी अपघात झाला होता.
गौरीकुंडजवळ झालेल्या या अपघाताबद्दल राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताची बातमी ऐकून अतिशय दुःख झाले. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी बाबा केदारकडे प्रार्थना करतो.
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ! गगनाला भिडल्या आजच्या किंमती, चांदीचा भाव स्थिर
१७ मे रोजी केदारनाथमध्ये एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर कोसळले. त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते – एक पायलट, एक डॉक्टर आणि एक नर्ससुखरूप बचावले. हे हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्समधून एका रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला येत होते. त्या दरम्यान, ते उतरताना जमिनीवर पडले.