हिमाचल प्रदेश : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या 26 वर्षीय जवानाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन रक्षकमध्ये सिरमौर जिल्ह्यातील लाल प्रवीण शर्मा शहीद झाले. प्रवीण शर्मा हे सिरमौर जिल्ह्यातील राजगढ उपविभागातील पालू गावचे रहिवासी होते. ते वन पॅरा स्पेशल फोर्समध्ये सेवा बजावत होते. ते त्याच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते आणि दोन महिन्यांनीच त्याचे लग्न होणार होते.
हेही वाचा: चोरी करणे चोरट्यांना महागात पडले; मालकाने केली बेदम मारहाण
जिल्ह्यातील सिरमौरचे उपायुक्त सुमित खिमटा यांनी दिलेल्या माहितीनुसार शहीद प्रवीण शर्मा यांचे पार्थिव सोमवारी (12 ऑगस्ट) सकाळी चंदीगडला पोहोचेल. चंदीगड येथून मृतदेह आणण्यासाठी प्रशासनाने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे. यासंदर्भात राजगडच्या एसडीएमलाही योग्य मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सोमवारी शहीद जवानावर त्यांच्या मूळ गावी हब्बन येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रवीण शर्मा यांच्या पश्चात आई-वडील आणि आजी आहेत. प्रवीणच्या दोन विवाहित बहिणी पूजा आणि आरती याही भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होत्या. प्रवीण यांचे वडील राजेश शर्मा हे शेतकरी असून ते गावात एक छोटेसे दुकानही चालवतात. आई रेखा शर्मा गृहिणी आहेत. प्रवीण जेव्हा सुट्टीवर घरी येच होते तेव्हा घरचे त्यांना लग्नासाठी आग्रह करत होते. पण प्रवीण कुठल्या ना कुठल्या बहाण्याने लग्न पुढे ढकलत असे. यावेळी जुलैमध्ये प्रवीण घरी आले असता कुटुंबीयांनी या नात्याला दुजोरा दिला.
हेही वाचा: शरद पवारांकडून आरक्षणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; म्हणाले…
सिरमौर जिल्ह्यातील सैनिक कल्याण मंडळाचे उपसंचालक (निवृत्त) मेजर दीपक धवन म्हणाले, लष्कराच्या मुख्यालयातून माहिती मिळाली की राजगढच्या भारतीय सैन्यात कार्यरत पहिल्या पॅरा स्पेशल फोर्सचे लान्स नाईक प्रवीण शर्मा ऑपरेशन रक्षक दरम्यान शहीद झाले आहेत. विशेष दलाची तुकडी प्रवीण शर्मा यांच्या घरी पोहोचली आहे. प्रवीण शर्मा यांच्यावर शासकीय आणि लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, प्रवीण शर्मा यांच्या हौतात्म्याने देशासह हिमाचल प्रदेशात हळहळ व्यक्त केली जात आहे . हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, उद्योगमंत्री हर्षवर्धन चौहान आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी शहीद प्रवीण शर्मा यांच्या कुटुंबाप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. यापूर्वी 24 जुलै रोजी श्रीनगरजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गनर दिलावर खान शहीद झाला होते. तेही हिमाचलमधील उना जिल्ह्यातील रहिवासी होते.