लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर लतीफ भटचा खात्मा; कुलगामच्या जंगलपोरामध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांची मोठी कारवाई
पोलिसांच्या सूत्रांनुसार, लष्कर-ए-तोयबाचा (LeT) एक उच्च कमांडर लतीफ भट आणि त्याचे काही साथीदार लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यावर कुलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लतीफचा शोध तीव्र करण्यात आला होता. ही चकमक दहशतवादी आणि जम्मू आणि काश्मीर पोलीस व सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांमध्ये ही चकमक झाली.
कुलगाममध्ये नुकताच एक दहशतवादी ठार झाला.
१६ नोव्हेंबर रोजी कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आणि दुसरा अडकल्याचे वृत्त आहे. ही कारवाई जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी केली. एसएसपींच्या म्हणण्यानुसार, लतीफ पहाटे २:४५ च्या सुमारास मशिदीत घुसला आणि त्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. सुरक्षा यंत्रणांनी धार्मिक स्थळाचे नुकसान होऊ नये याची अत्यंत काळजी घेतली आणि मशिदीच्या आत कोणतीही कारवाई केली नाही.
VIDEO | Jammu and Kashmir: Security beefed up in Kulgam, intense checking by security forces Top LeT terrorist Lateef Bhat has been killed in encounter with security forces in Kulgam. #KulgamEncounter #JammuAndKashmir (Visuals deferred by unspecified time) (Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTfmBd) — Press Trust of India (@PTI_News) November 18, 2026
बातमी अपडेट होत आहे…






