दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर.... Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल
शाओमी 18 प्रो स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत EUR 1,399 म्हणजेच सुमारे 1,44,000 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत EUR 1,599 म्हणजेच सुमारे 1,64,000 रुपये आहे. शाओमी 18 प्रो मॅक्स स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत EUR 1,599 म्हणजेच सुमारे 1,64,000 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत EUR 1,799 म्हणजेच सुमारे 1,85,000 रुपये आहे. 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत EUR 2,099 म्हणजेच सुमारे 2,16,000 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोन्स ब्लॅक, कॉस्मिक ब्लू, वेलवेट रेड आणि व्हाईट रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य: Xiaomi)
शाओमी 18 प्रो आणि शाओमी 18 प्रो मॅक्स हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीच्या लेटेस्ट हायपरओएस 4 वर चालतात, जे अँड्रॉईड 17 वर आधारित आहेत. दोन्ही मॉडेल्स डुअल-सिम स्मार्टफोन्स आहेत. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 6.9-इंच फुल-एचडी+ (1,208 x 2,624 पिक्सेल) आणि प्रो मॉडेलमध्ये 6.4-इंच फुल-एचडी+ (1,120 x 2,436 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 300Hz टच सँपलिंग रेट, 4,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि DCI-P3 वाइड कलर गॅमटसह येतो.
हँडसेटमध्ये प्रायव्हसी डिस्प्ले फीचर देखील देण्यात आला आहे, जो आजूबाजूच्या लोकांसाठी स्क्रीनचा व्ह्यूईंग अँगल कमी करतो. प्रो मॉडेलमध्ये 2.7-इंच (596 x 912 पिक्सेल) आणि प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 2.9-इंच (596 x 976 पिक्सल) चा सेकेंडरी अमोलेड टचस्क्रीन्स दिल्या आहेत, ज्या 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट ऑफर करतात.
प्रो डिव्हाईसमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 SoC दिला आहे. तर प्रो मॅक्स डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रिम जेन 6 चिपसेट आहे, जो 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. स्मार्टफोन्समध्ये अॅड्रेनो जीपीयू, एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 इंटरनल स्टोरेज मिळणार आहे.
शाओमी 18 प्रो सिरीजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (ओआयएस) सह 200-मेगापिक्सेल (f/1.67) मुख्य शूटर, ओआयएस सह 200-मेगापिक्सेल (f/2.4) पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 102-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 50-मेगापिक्सेल (f/2.4) अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट आहे. हे लाइनअप 8K/30 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी 18 प्रो आणि शाओमी 18 प्रो मॅक्समध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळणार आहे.
Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता
शाओमी 18 प्रो मॅक्समध्ये 7,050mAh बॅटरी आणि शाओमी 18 प्रो मध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईस 100W (वायर्ड) आणि 50W (वायरलेस) फास्ट चार्जिंगसह 27W वायर्ड रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. सुरक्षेसाठी यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट मिळणार आहे.






