Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अटल बिहारी वाजपेयी., लालकृष्ण आडवाणी, ठाकरे, नबीन…! आत्तापर्यंत हे नेते बनले BJP National President

BJP National President : नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर आत्तापर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण कोण झाले याची यादी समोर आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 20, 2026 | 06:33 PM
List of all the national presidents of the BJP till today Atal Bihari Vajpayee, L.K. Advani nitin nabin

List of all the national presidents of the BJP till today Atal Bihari Vajpayee, L.K. Advani nitin nabin

Follow Us
Close
Follow Us:

BJP National President : नवी दिल्ली : सर्वात जास्त कार्यकर्त्यांची संख्या असलेला आणि लोकप्रिय असलेल्या भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी (BJP national president) निवड झाली आहे. पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना माळ घालून त्यांचे अभिनंदन केले. नितीन नबीन यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे.

नितीन नबीन यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण जनरल झेड म्हणजेच तरुण मतदार आहेत. नितीन नबीन हे भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले नबीन हे ४५ वर्षांचे आहेत. दरम्यान, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ८३ वर्षांचे आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजप पक्षाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जाते. यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपचा कारभार सांभाळला आहे.

हे देखील वाचा : नितीन नबीन हे माझे नवीन बॉस..! भाजप संघटन पर्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य

अटलबिहारी वाजपेयींपासून नितीन नबीनपर्यंत…

भाजप राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी होते. त्यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि जेपी नड्डा यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली. आता, नितीन नवीन यांना सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे पक्षाच्या नेतृत्वातील एका नवीन अध्यायाची सुरुवात होते. अटलबिहारी वाजपेयींपासून नितीन नवीनपर्यंत पक्षाचे अध्यक्ष कोण होते आणि कोणत्या वयात होते ते आपण जाणून घेऊया…

  • अटलबिहारी वाजपेयी – १९८०-१९८६ (५५ वर्षे)
  • एल.के. अडवाणी – १९९६-१९९१: पहिला कार्यकाळ (५८ वर्षे)
    १९९३-१९९८: दुसरा कार्यकाळ (६५ वर्षे)
    २००४-२००५: तिसरा कार्यकाळ (७७ वर्षे)
  • मुरली मनोहर जोशी – १९९१-१९९३ (५७ वर्षे)
  • कुशाभाऊ ठाकरे – १९९८-२००० (७५ वर्षे)
  • बंगारू लक्ष्मण – २०००-२००१ (६१ वर्षे)
  • जन कृष्णमूर्ती – २००१-२००२ (७२ वर्षे)
  • एम. वेंकय्या नायडू – २००२-२००४ (५३ वर्षे)
  • राजनाथ सिंह – २००५-२००९: पहिला कार्यकाळ (५४ वर्षे)
    २०१३-२०१४: दुसरा कार्यकाळ (६१ वर्षे)
  • नितीन गडकरी – २००९-२०१३ (५२ वर्षे)
  • अमित शाह – २०१४-२०२० (४९ वर्षे)
  • जेपी नड्डा – २०२०-२०२४ (५९ वर्षे)
  • नितीन नबीन – २०२६ (४५ वर्षे)
हे देखील वाचा : भाजप पक्षाला मिळाले सर्वात तरुण अध्यक्ष; नितीन नबीन यांनी स्वीकारला पदभार

कोण आहेत नितीन नबीन?

नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० रोजी झारखंडमधील रांची येथे झाला. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे देखील आमदार होते आणि जेपी चळवळीशी संबंधित होते. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वडिलांच्या निधनानंतर नितीन यांनी राजकारणात प्रवेश केला. २००६ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर, ते बांकीपूरमधून निवडणूक जिंकत राहिले. २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ मध्ये ते बांकीपूर येथून सलग विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस अशी पदेही भूषवली आहेत.

Web Title: List of all the national presidents of the bjp till today atal bihari vajpayee lk advani nitin nabin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Atal Bihari Vajpayee
  • BJP President Election

संबंधित बातम्या

BJP President Nitin Nabin: नितीन नबीन यांच्यासमोर असणार आव्हानांचा डोंगर; बंगाल- आसाममध्ये लागणार कस
1

BJP President Nitin Nabin: नितीन नबीन यांच्यासमोर असणार आव्हानांचा डोंगर; बंगाल- आसाममध्ये लागणार कस

BJP New President : भाजप पक्षाला मिळाले सर्वात तरुण अध्यक्ष; नितीन नबीन यांनी स्वीकारला पदभार
2

BJP New President : भाजप पक्षाला मिळाले सर्वात तरुण अध्यक्ष; नितीन नबीन यांनी स्वीकारला पदभार

Nitin Nabin: मोठी बातमी! नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; बिनविरोध निवडीनंतर उद्या घेणार पदभार
3

Nitin Nabin: मोठी बातमी! नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; बिनविरोध निवडीनंतर उद्या घेणार पदभार

भाजप पक्षामध्ये लोकशाही की हुकूमशाही? कशी होते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
4

भाजप पक्षामध्ये लोकशाही की हुकूमशाही? कशी होते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.