Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Loksabha Elections 2024 Expenses Report: लोकसभा निवडणुकीतील खर्चाची आकडेवारी जाहीर; भाजपच्या खर्चाचा आकडा पाहून डोळेच विस्फारतील

एडीआरच्या अहवालानुसार, यानंतर प्रवास खर्च येतो, जो ७९५ कोटी रुपये होता. त्याच वेळी, उमेदवारांना एकरकमी पैसे म्हणून ४०२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 21, 2025 | 09:57 AM
Loksabha Elections 2024 Expenses Report: लोकसभा निवडणुकीतील खर्चाची आकडेवारी जाहीर; भाजपच्या खर्चाचा आकडा पाहून डोळेच विस्फारतील
Follow Us
Close
Follow Us:

Loksabha Elections 2024: मागील वर्षी २०२४ मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात भारतातील लोकसभा निवडणुकांची चर्चा झाली. देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. या निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्षांनी अफाट पैसा खर्च केला. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. भाजपने या निवडणुकीत किती खर्च केला. याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह इतर पक्षांनी  किती खर्च केला, याचा सविस्तर अहवाल निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने शुक्रवारी (२० जून २०२५) जाहीर केला आहे. या अहवालानुसार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सुमारे १,४९४ कोटी रुपये खर्च केले, जे एकूण खर्चाच्या ४४.५६ टक्के आहे. याशिवाय एडीआरने ३२ राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या निवडणूक खर्चाचे विश्लेषण केले आहे.

Maharashtra Monsoon Alert: आज काय खरं नाही! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; पुढील चार दिवस

एडीआरच्या अहवालानुसार, भाजपनंतर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकात काँग्रेसने ६२० कोटी रुपये खर्च केला आहे.  जो पक्षाच्या एकूण खर्चाच्या १८.५ टक्के आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीममध्ये एकाच वेळी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये (१६ मार्च ते ६ जून २०२४ दरम्यान) या पक्षांनी एकूण ३,३५२.८१ कोटी रुपये खर्च केले.

राष्ट्रीय पक्षांनी ६,९३०.२४६ कोटी रुपये उभारले

या खर्चात राष्ट्रीय पक्षांचा वाटा २,२०४ कोटी रुपयांपेक्षा जास्त (६५.७५ टक्के) होता. राष्ट्रीय पक्षांनी ६,९३०.२४६ कोटी रुपये (९३.०८ टक्के) उभारले होते, तर प्रादेशिक पक्षांना ५१५.३२ कोटी रुपये (६.९२ टक्के) मिळाले. हे विश्लेषण राजकीय पक्षांना सार्वत्रिक निवडणुकीच्या ९० दिवसांच्या आत आणि विधानसभा निवडणुकीच्या ७५ दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर कराव्या लागणाऱ्या अनिवार्य खर्चाच्या विवरणपत्रावर आधारित आहे. हा तपशील दाखल करण्यात खूप उशीर  झाल्याचेही एडीआरने म्हटले आहे.

अहवालानुसार, आम आदमी पक्षाची (आप) माहिती १६८ दिवसांच्या आयोगाला उशिराने मिळाली, तर भाजपची माहिती १३९ ते १५४ दिवसांच्या उशिराने मिळाली. एडीआरच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी फक्त काँग्रेसने एकत्रित अहवाल सादर केला.

नांदेडमध्ये चोर समजून २४ वर्षीय युवकाची हत्या; ‘नेटग्रीड’मुळे ओळख पटली; चार आरोपींना अटक

डिजिटल माध्यमातून निवडणूक प्रचाराचा खर्च

एडीआरच्या अहवालानुसार, यानंतर प्रवास खर्च येतो, जो ७९५ कोटी रुपये होता. त्याच वेळी, उमेदवारांना एकरकमी पैसे म्हणून ४०२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पक्षांनी डिजिटल माध्यमातून प्रचार करण्यासाठी १३२ कोटी रुपये आणि उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रकाशित करण्यासाठी २८ कोटी रुपये खर्च केले.

या पक्षांनी तपशील दिले नाहीत

स्टार प्रचारकांचा प्रवास खर्च वाढला. ७९५ कोटी रुपयांपैकी ७६५ कोटी रुपये (९६.२२ टक्के) पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या प्रवासावर खर्च झाले, तर इतर नेत्यांवर फक्त ३० कोटी रुपये खर्च झाले. अहवाल तयार करताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि शिवसेना (Shisena) यासह २१ पक्षांच्या खर्चाचे तपशील निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध नव्हते.

विटा-सिमेंट नाही! 3D तंत्रज्ञानाने स्वित्झर्लंडमध्ये बनवण्यात आला जगातील सर्वात उंच टॉवर; फार अद्भुत आहे याची रचना

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (एजेएसयू) पार्टी, केसी(एम) यांचा खर्चाचा तपशील उपलब्ध नव्हता. दरम्यान, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि केरळ काँग्रेस (एम) या दोन पक्षांनी निवडणूक लढवूनही शून्य खर्च जाहीर केला.

 

Web Title: Lok sabha election expenditure figures released adr report must be read once

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • loksabha elections 2024

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
3

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.