Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madras High Court News: पत्नी म्हणजे व्होडाफोनचा ‘पग’ कुत्रा नाही; मद्रास उच्च न्यायालयाने पतीला खडसावले

Madras High Court: पतीने पत्नीला मुंबईला नेले नाही, ही त्याचीच चूक पतीने याचिकेत म्हटले होते की, नोकरीसाठी तो तमिळनाडूतील शिवगंगाहून मुंबईला गेला; मात्र पत्नी त्याच्यासोबत आली नाही. २०१४ मध्ये त्याने शिवगंगा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली

  • By anuradha sagar
Updated On: Sep 04, 2026 | 11:56 AM
Madras High Court, Divorce Case, न

Madras High Court, Divorce Case, न

Follow Us
Follow Us:
  • पतीच्या मागे प्रत्येक ठिकाणी पत्नीने जाणे बंधनकारक नाही; मद्रास उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण.
  • १६ वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या ६७ वर्षीय पतीची घटस्फोट याचिका फेटाळताना न्यायालयाची टिप्पणी.
  • १९९२ मध्ये लग्न झालेल्या या दाम्पत्याला ४ मुले असून पती नोकरीसाठी मुंबईला गेला होता.
Madras High Court News: पत्नीने पतीच्या मागे व्होडाफोनच्या जाहिरातीतील पग कुत्र्यासारखे सतत फिरत राहावे, अशी अपेक्षा करता येणार नाही. नोकरी किंवा अन्य कारणांमुळे पती ज्या ठिकाणी जाईल, त्या प्रत्येक वेळी पत्नीने त्याच्यासोबत जाणे आवश्यक नसल्याचे मत मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी मांडले. हे प्रकरण सुमारे १६ वर्षांपासून वेगळे राहत असलेल्या दाम्पत्याशी संबंधित आहे.

पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती एम. डी. सुमती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोघांचे लग्न सप्टेंबर १९९२ मध्ये झाले होते. त्यांना ४ मुले आहेत. सध्या पतीचे वय ६७वर्षे आहे. न्यायालयाने म्हटले की, पती-पत्नीमध्ये मोठी कटुता निर्माण झाली असून पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही.

दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण

दीर्घकाळ विभक्त राहणे, एकत्र न राहणे आणि वैवाहिक संबंध पूर्णपणे तुटणे ही मानसिक छळाची कारणे ठरू शकतात.
मद्रास उच्च न्यायालय (घटस्फोटाच्या प्रकरणावर)

पतीने पत्नीला मुंबईला नेले नाही, ही त्याचीच चूक पतीने याचिकेत म्हटले होते की, नोकरीसाठी तो तमिळनाडूतील शिवगंगाहून मुंबईला गेला; मात्र पत्नी त्याच्यासोबत आली नाही. २०१४ मध्ये त्याने शिवगंगा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. त्याने पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही केला. सप्टेंबर २०२१ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली. पती स्वतः नोकरीसाठी मुंबईला गेला आणि त्याने पत्नीला सोबत नेले नाही. त्यामुळे स्वतःच्या चुकीचा फायदा घेत पती घटस्फोट मागू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द

नात्यात मोठी दरी

पती-पत्नी सुमारे १६ वर्षांपासून वेगळे राहत होते. पत्नीने पतीकडे परत जाण्यासाठी कोणतेही औपचारिक प्रयत्न केल्याचेही समोर आले नाही. दोघांमध्ये समझोता होण्याची शक्यता तपासण्यासाठी उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंशी चर्चा केली; मात्र त्यातून तोडगा निघाला नाही. त्यांच्या वैवाहिक नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकत्र येण्याची शक्यता उरलेली नाही, दीर्घकाळ वेगळे राहणे, वैवाहिक जीवन संपुष्टात येणे आणि नाते पूर्णपणे तुटणे, परिस्थितीनुसार मानसिक क्रौर्याच्या कक्षेत येऊ शकते.

 

Web Title: Madras high court verdict on wife following husband divorce case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Divorce Case
  • Madras High Court

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.