Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; ‘लष्कर-ए-तोयबा’चा मुख्य कमांडर ठार

भारतीय लष्कराने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून, रात्रभर शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, घनदाट जंगल आणि डोंगराळ प्रदेशामुळे ही मोहीम अत्यंत सावधगिरीने राबवली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2026 | 07:23 AM
जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे मोठी चकमक

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे मोठी चकमक

Follow Us
Follow Us:

जम्मू : दक्षिण काश्मीरमधील युसमार्ग येथे मंगळवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चा प्रमुख कमांडर सुलेमान शाह उर्फ ​​फौजी मुसा ठार झाला. गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने कोरग परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या जोरदार चकमकीत मुसा ठार झाला. आणखी तीन दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे.

भारतीय लष्कराने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून, रात्रभर शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, घनदाट जंगल आणि डोंगराळ प्रदेशामुळे ही मोहीम अत्यंत सावधगिरीने राबवली जात आहे. बुधवारी सकाळी ही मोहीम अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांना घेरण्याचा आणि त्यांचे पळून जाण्याचे संभाव्य मार्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनुसार, मुसा २०२२ मध्ये घुसखोरी करून काश्मीर खोऱ्यात दाखल झाला आणि तेव्हापासून तो सक्रियपणे आपले जाळे विस्तारत होता.

पीर पंजालच्या दोन्ही बाजूंच्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग आणि दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती करण्यात त्याची भूमिका असल्याची माहितीही समोर येत आहे. लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होण्यापूर्वी तो एक पाकिस्तानी एसएसजी कमांडो होता.

युसमार्ग चकमकीशी संबंध

सुरक्षा दलांनी ४-५ सप्टेंबर रोजी युसमार्ग येथे झालेल्या चकमकीत पाकिस्तानी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी यासिरला ठार केले. या चकमकीनंतर, सुरक्षा दलांना संशय आला की, त्याचा एक साथीदार जंगलात लपून बसला आहे. वृत्तानुसार, त्या साथीदाराची ओळख आसिफ फौजी उर्फ ​​मुसा अशी पटली आहे. युसमार्गच्या उंच पर्वतीय जंगलात त्याचा शोध घेण्यासाठी एक मोठी शोधमोहीम सुरू करण्यात आली.

पीर पंजालच्या जंगलात सततचा दबाव

सुरक्षा यंत्रणांनी गेल्या दोन महिन्यांपासून पीर पंजालच्या घनदाट जंगलात कार्यरत असलेल्या परदेशी दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाया तीव्र केल्या आहेत. ४-५ सप्टेंबरच्या चकमकीत ठार झालेला यासिर, २०२१ ते २०२४ दरम्यान पूंछमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यांशी संबंधित होता. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, यासिर आणि त्याचा साथीदार बऱ्याच काळापासून निगराणीखाली होते. सततच्या शोधमोहिमांनंतर तो पीर पंजालच्या जंगलांच्या दिशेने गेला होता.

RAF Fairford : इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटनची थेट उडी? ‘या’ 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जागतिक वर्तुळात खळबळ

Web Title: Major encounter between security forces and terrorists in budgam jammu and kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 07:17 AM

Topics:  

  • indian army
  • terror attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.