Mallikarjun Kharge detained by Delhi Police during Delhi protest against election commission
Mallikarjun Kharge taken into custody police : नवी दिल्ली : देशाच्या राजधानीमध्ये जोरदार गदारोळ सुरु आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीमध्ये मतांची चोरी केली असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. याविरोधात कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवन ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सर्व विरोधी खासदार हे आक्रमक पद्धतीने सहभागी झाले आहे. हा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला असून महत्त्वाच्या नेत्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ताब्यात घेतले आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी केली असल्याचा आरोप केला आहे. एकाच व्यक्तीने अनेक राज्यांमध्ये मतदान केले आहे. तर अनेक मतदारांची नावे ही मतदार यादीमधून वगळण्यात आली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला. तसेच पुरावे देखील सादर केले आहे. मात्र आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून देशाची माफी मागा असे राहुल गांधींना सांगितले. यानंतर कॉंग्रेस पक्ष आणि विरोधात असलेल्या पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला आहे.
राहुल गांधींसह विरोधातील 300 खासदारांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला. विरोधकांचा हा मोर्चा अडवण्यात आला असून कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत विरोधक करताना कॉंग्रेसने लिहिले आहे की, आज, इंडिया आघाडीचे खासदार मत चोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढत होते. नरेंद्र मोदींनी पोलिस पाठवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पण हुकूमशाही सरकारने लक्षात ठेवावे – आम्ही घाबरणार नाही, आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी ठाम राहू, असा आक्रमक पवित्रा कॉंग्रेसकडून घेण्यात आला आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge को पुलिस ने हिरासत में लिया।
आज वोट चोरी के खिलाफ INDIA गठबंधन के सांसद चुनाव आयोग तक मार्च निकाल रहे थे। नरेंद्र मोदी ने पुलिस भेजकर उनकी आवाज दबाने की कोशिश की।
लेकिन तानाशाह सरकार याद रखे- हम डरने वाले नहीं हैं, लोकतंत्र की रक्षा में डटे… pic.twitter.com/b4zOyz3LMJ
— Congress (@INCIndia) August 11, 2025
इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोग विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 300 खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अडवला. खासदारांनी हातामध्ये ‘सेव्ह व्होट’चे बॅनर्सच हाती घेतले होते. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानही दिली नाही. पोलिसांनी संसदेच्या आवारातच इंडिया आघाडीचा मोर्चा रोखल्याने खासदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदारांनी आवारातच पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतलं. त्यामुळे दिल्लीमध्ये वातावरण तापले असल्याचे दिसून येत आहे.