न्यायालयाची शिस्तही धाब्यावर! कमोडवर बसून हायकोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीला हजेरी, Video तुफान व्हायरल
गुजरात उच्च न्यायालयाच्या कामगाजादरम्यान एक विचित्र प्रकार समोर आला आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान एक व्यक्ती शौचालयात बसून हजेरी लावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे न्यायालयीन कार्यवाहीच्या शिस्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ही घटना २० जून रोजी घडली असून न्यायमूर्ती निरजार एस देसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती ‘समद बॅटरी’ या नावाने लॉग इन झालेला दिसतो. सुरुवातीला तो केवळ ब्लूटूथ इअरफोन घालून स्क्रीनवर दिसतो, पण काही वेळातच त्याने मोबाईल दूर ठेवताच स्पष्ट होते की तो प्रत्यक्षात शौचालयात बसलेला आहे. त्यानंतर तो स्वतःची स्वच्छता करताना आणि मग त्या खोलीतून बाहेर पडतानाही दिसतो. काही वेळासाठी तो स्क्रीनवरून गायब होतो आणि नंतर एका वेगळ्या खोलीत पुन्हा दिसतो.
पोटी में बैठा हुआ हाई कोर्ट की हियरिंग अटेंड कर रहा है। कुछ तो मर्यादा रखनी चाहिए कानून और संविधान की। मजाक बना दिया।
इस पर बड़ी पेनल्टी लगनी चाहिए#GujaratHighCourt #VirtualHearings #VideoConferencehearing pic.twitter.com/zdmAOaBg40— Sujeet Swami️ (@shibbu87) June 27, 2025
कोर्टाच्या नोंदींनुसार, सदर व्यक्ती ही एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेतील प्रतिसादक होता. या प्रकरणात तो मूळ फिर्यादी होता. दोन्ही पक्षांमध्ये परस्पर समेट झाल्यानंतर न्यायालयाने एफआयआर रद्द केला.
ऑनलाइन न्यायप्रक्रियेदरम्यान अशा प्रकारच्या अनुचित वर्तनाची ही काही पहिली वेळ नाही. एप्रिल महिन्यात गुजरात उच्च न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीदरम्यान सिगारेट ओढणाऱ्या एका याचिकाकर्त्यावर ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला होता. याआधी मार्च महिन्यात दिल्लीतील एका न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर असलेल्या आणि सिगारेट ओढणाऱ्या एका व्यक्तीला समन्स बजावला होता.
सोलापुरात 45 वर्षीय महिलेचा दोनदा विनयभंग; माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
सद्याच्या प्रकरणामुळे ऑनलाइन सुनावण्यांची शिस्त आणि त्यातील व्यावसायिकता यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे. कोर्टाचे गांभीर्य राखणे आणि नागरी जबाबदारी जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.