Narendra Modi : 'मन की बात'च्या 140 व्या भागाची देशभर चर्चा; भाजप नेत्यांकडून मोदींच्या उपक्रमाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा 140 वा भाग देशभरात उत्साहात ऐकण्यात आला. नशामुक्त भारत, पर्यटन, आरोग्य, युवकांचे योगदान आणि पाटणा संग्रहालयाच्या उल्लेखावर भाजप नेत्यांनी समाधान व्यक्त करत कार्यक्रमाचे कौतुक केले.
Narendra Modi : 'मन की बात'च्या 140 व्या भागाची देशभर चर्चा; भाजप नेत्यांकडून मोदींच्या उपक्रमाचे कौतुक
Narendra Modi : 'मन की बात'च्या 140 व्या भागाची देशभर चर्चा; भाजप नेत्यांकडून मोदींच्या उपक्रमाचे कौतुकफोटो सौजन्य : आयएएनएस
Published on: 
Updated on: 
  • छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचेही कौतुक

  • बासित अली यांच्या मते, पंतप्रधान समाजाला जागृत करतात

  • बिहारच्या संग्रहालयाचा पंतप्रधानांकडून उल्लेख

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील 'मन की बात' हा कार्यक्रम सर्वांना श्रृत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाचा चक्क 140 वा भाग रविवारी देशभरात प्रसारित करण्यात आला. हा भाग भाजपचे नेते आणि भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी मनापासून ऐकला.

दरम्यान, आपल्या नेत्याकडून मागील 140 भागात सुरू असलेल्या या उपक्रमाचे देशातील विविध राज्यातील नेत्यांनी कौतुक केले. त्यांच्या मते, 'मन की बात' हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून समाजात जागरूकता निर्माण करणारे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना ओळख मिळवून देणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी कार्यक्रमात मोदी यांनी मांडलेल्या 'नशामुक्त भारता'च्या संदेशाचे कौतुक केले. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन करताना पंतप्रधानांनी एका व्यसनाधीन व्यक्तीशी फोनवर संवाद साधला. त्या व्यक्तीने आपला अनुभव सांगितला. व्यसनामुळे शरीराचे नुकसान होते, त्यातून काहीही चांगले मिळत नाही, हा महत्त्वाचा संदेश देशवासीयांना मिळाल्याचे दुबे म्हणाले.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचेही कौतुक

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सरगुजा येथे कार्यकर्त्यांसह कार्यक्रम ऐकला. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील नागरिक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात. तसेच या माध्यमातून पंतप्रधानांशी जोडले जाण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी 'मन की बात' हा राजकारणापलीकडचा कार्यक्रम असल्याचे म्हटले. देशभरातील नागरिक करत असलेल्या चांगल्या कामांना या कार्यक्रमातून व्यासपीठ मिळते. आरोग्य, फिटनेस, युवकांचे यश आणि स्टार्टअप यांसारख्या विषयांवर चर्चा करून समाजाला सकारात्मक दिशा दिली जाते, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी लखनऊ छावणी विधानसभा मतदारसंघातील बाबू बनारसी दास वॉर्डमधील बूथ क्रमांक 2258 येथे कार्यक्रम ऐकला. पंतप्रधान या कार्यक्रमातून देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि प्रेरणादायी कथा मांडतात. युवक, ज्येष्ठ नागरिक आणि उद्योजकांच्या योगदानाची दखल घेतली जाते, असे त्यांनी सांगितले.

Narendra Modi : 'मन की बात'च्या 140 व्या भागाची देशभर चर्चा; भाजप नेत्यांकडून मोदींच्या उपक्रमाचे कौतुक
राहुल गांधींचा चैन्नई दौरा यशस्वी? एम. के. स्टॅलिन यांनी भेटीनंतर सूचक पोस्ट केल्याने चर्चांना उधाण

बासित अली यांच्या मते, पंतप्रधान समाजाला जागृत करतात

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर बासित अली यांनीही कार्यक्रमाचे कौतुक केले. देशाच्या विविध भागांतील प्रेरणादायी व्यक्ती आणि त्यांच्या कार्याची माहिती या माध्यमातून मिळते. आरोग्य, कला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित विषयांवर चर्चा करून पंतप्रधान समाजाला जागरूक करण्याचे काम करतात, असे ते म्हणाले.

ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिडा यांनी डेनु पंचायत परिसरात कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत कार्यक्रम ऐकला. पर्यटन मंत्री म्हणून पंतप्रधानांनी देशातील पर्यटनस्थळांना भेट देण्याचे आणि स्थानिक संग्रहालये पाहण्याचे केलेले आवाहन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या हवामानात नागरिकांनी बाहेर पडून पर्यटनाचा आनंद घ्यावा, या संदेशाचेही त्यांनी स्वागत केले.

Narendra Modi : 'मन की बात'च्या 140 व्या भागाची देशभर चर्चा; भाजप नेत्यांकडून मोदींच्या उपक्रमाचे कौतुक
Indian Armed Forces: देशसेवेसाठी मुलींची 'गरुडझेप'; NDA मध्ये 'या' दोन मुलींनी घेतली उत्तुंग भरारी

बिहारच्या संग्रहालयाचा पंतप्रधानांकडून उल्लेख

बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांनी पाटणा संग्रहालयाचा 'मन की बात'मध्ये उल्लेख झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पाटणा येथील आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचा जागतिक स्तरावर नववा आणि आशियात पहिला क्रमांक असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यामुळे बिहारमधील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे ते म्हणाले.

बिहार सरकारमधील मंत्री दिलीप जायसवाल यांनीही संग्रहालयाच्या उल्लेखाबद्दल समाधान व्यक्त केले. बिहारमधील संग्रहालयासह बापू सभागृह, बापू टॉवर, मरीन ड्राइव्ह आणि गंगा पथ यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यकाळातील विकासकामांची आठवण करून दिली.

राजस्थान सरकारमधील मंत्री जवाहर सिंह बेढम यांनी जयपूर येथील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम ऐकला. पंतप्रधान प्रत्येक भागातून काहीतरी नवीन विचार मांडतात. त्यांचे संबोधन नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरते, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा साध्वी निरंजन ज्योती यांनी 2014 पासून पंतप्रधान 'मन की बात'च्या माध्यमातून विकसित भारताच्या उभारणीसाठी नागरिकांच्या सूचना आणि विचार मांडत असल्याचे सांगितले. राष्ट्रीय कल्याण, वैयक्तिक आरोग्य आणि कौटुंबिक हिताशी संबंधित या सूचना नागरिकांना सकारात्मक पावले उचलण्यासाठी प्रेरित करतात. योग हे त्याचे एक उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.