
मनोज जरांगे पाटील आता 'या' मागणीसाठी जाणार दिल्लीला; 15 डिसेंबरपासून असेल दौरा
नवी दिल्ली : शिक्षकांच्या कथित मानसिक छळामुळे दुःखी होऊन इयत्ता दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटील याने आपले जीवन संपवले. या हृदयद्रावक घटनेनंतर, मराठा समाजासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिवंगत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली येण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जरांगे पाटील यांनी या प्रकरणात कठोर पावले उचलत सरकारकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या दोषी शिक्षकांना ताबडतोब अटक करावी आणि संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी, अशा त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. सरकारने हा अत्यंत संवेदनशील मुद्दा पूर्ण गांभीर्याने घ्यावा, याची खात्री करावी असा आग्रह त्यांनी धरला आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दिल्ली दौरा १५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार. ते संध्याकाळी साडेचार वाजता छत्रपती संभाजीनगर येथून विमानाने दिल्लीसाठी प्रस्थान करतील. त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता ते दिल्ली विमानतळावर पोहोचतील आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रात्री मुक्काम करतील.
हेदेखील वाचा : Manoj Jarange Patil News: त्या दिवशी जिल्ह्यात एक चाकही फिरू देणार नाही….; जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून सरकारला इशारा
त्यानंतर दुसऱ्या दिवशी, १६ डिसेंबर २०२५ च्या सकाळी, मनोज जरांगे पाटील थेट शौर्य पाटील यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील आणि सांत्वन करतील. कुटुंबीयांची भेट घेऊन न्यायासाठी पाठिंबा व्यक्त केल्यानंतर, ते त्याच दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता विमानाने परत छत्रपती संभाजीनगरसाठी प्रस्थान करतील. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, ते शौर्य पाटील यांच्या कुटुंबासोबत उभे आहेत आणि न्याय मिळेपर्यंत त्यांचा पाठिंबा कायम राहील.
मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या
मराठी विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. त्याने सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप केले आहेत. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव शौर्य प्रदीप पाटील असे पीडित विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता.
हेदेखील वाचा : राज्यातील 5800 पेक्षा अधिक निवासी डॉक्टरांवर मोठं संकट; ‘मार्ड’च्या सर्वेक्षणातून अनेक बाबी उघड