Manoj Jarange Patil News: त्या दिवशी जिल्ह्यात एक चाकही फिरू देणार नाही....; जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून सरकारला इशारा
राज्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या यंत्रणेमुळे या कामात अडथळे आणले जात आहेत., अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. ह प्रकरणांच भिजत घोंगड ठेवायच आहे. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आम्ही एक आहोत. एका लेकीला आणि लेकाला त्यांचा बाप दिसत नाही. पण आता आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही. परळीवाल्यांनी काही माणसं कामाला लावलू आहेत. परळीतील काही लोकांनी जाणूनबुजून आरोपी सुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या आहेत. पण ज्या दिवशी आरोपी सुटेल, त्या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद ठेवू, त्यानंतर राज्य बंद करू,” असा इशारा देखील त्यांनी दिला.
“परळीतील एकजण सरकारला अडचणीत आणणारी विधानं का करतो, हे सरकारने शोधले पाहिजे.” असे म्हणत जरांगे यांनी संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाईची मागणी पुन्हा अधोरेखित केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास मंदावल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र टीका केली. “धन्यानीच हा संपूर्ण प्रकार घडवून आणला आहे. आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. पण ज्या दिवशी आरोपी सुटला, त्या दिवशी राज्यात चाकही फिरणार नाही.” सुरुवातीला या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू होता. कारण देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता, पण आता दिरंगाई जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.
“क्रूर हत्येतील आरोपी बाहेर कसे फिरतात? कृष्णा आंधळे कुठे आहे आणि तो सापडत का नाही?” सरकार या प्रकरणात कोणता दबाव आणत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संतोष देशमुखांची हत्या करणारे हत्या करणारे सापडत नाहीत, मग पोलीस महासंचालकांसोबत कोणत्या विषयाची बैठक होते? परळीतील व्यक्ती तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे का?” असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जरांगे म्हणाले की, “कृष्णा आंधळेने हत्या करतानाचे व्हिडिओ कॉल केले आहेत. तो पकडला की प्रकरणाचा मोठा उलगडा होईल.” त्यांनी सांगितले की, हा मुद्दा आज अधिवेशनातही उपस्थित झाला असून सरकारने चार ते पाच महिन्यांत हा विषय निकाली काढावा.
जगातील सर्वात लांबसडक कार, 100 फूट लांबी 75 लोकांची जागा; स्विमिंग पूल ते हॅलिपॅड सगळीच सोय
सरकारवर दबाव असल्याची शक्यता व्यक्त करत ते म्हणाले, “काल अजित पवारांसोबत त्या व्यक्तीची बैठक झाली. पोलीस महासंचालकांनाही यात सामील केलं जातंय. विकासाच्या कामात डीजीपीचे काय काम? काहीतरी शिजत आहे.”
फडणवीसांना थेट इशारा देत जरांगे म्हणाले, “फडणवीस साहेब, तुम्ही या खेळात सहभागी होऊ नका. चुकीच्या माणसाला जवळ ठेवल्यास आम्हाला अजितदादांचा राग येणार. तसेच, पीडित कुटुंबाने पुन्हा हाक दिल्यास “आम्ही कोणताही विचार न करता उभे राहू,” असा इशारा देत त्यांनी सरकारला कठोर निर्णयाची मागणी केली.






