Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे बसला भीषण आग; बस जळून खाक, 20 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 24, 2025 | 07:35 AM
आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे बसला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे बसला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Follow Us
Close
Follow Us:

कुरनूल : आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक मोठी दुर्घटना घडली. हैदराबादहून बंगळुरूला प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. आगीत अनेक लोक जिवंत जळाल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये ३९ लोक होते असे वृत्त आहे. बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हैदराबादहून प्रवास करणारी बस कुर्नूल शहराच्या बाहेरील उलिंडाकोंडाजवळ येताच मागून येणाऱ्या दुचाकीला धडकली. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे ती पेटली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे आता सांगितले जात आहे.

दरम्यान, कुरनूल जिल्ह्यातील चिन्ना टेक्कुर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल मला खूप धक्का बसला आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्त्वन करतो. शासन आणि अधिकारी जखमींसह बाधित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करतील, असे मुख्यमंत्री नायडू यांनी म्हटले आहे.

आगीची घटना हृदयद्रावक

मुख्यमंत्र्यांचे पुत्र, टीडीपीचे सरचिटणीस आणि राज्यमंत्री नारा लोकेश यांनीही अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेक्कुर गावाजवळ बसला लागलेल्या आगीची बातमी हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांना मी शोक व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो”.

जखमींना कुर्नूल जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल

या अपघातामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक लोक अडकल्याचेही वृत्त आहे. या आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना कुर्नूल जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. संपूर्ण बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

हेदेखील वाचा : हरियाणात एका शोरूमला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

Web Title: Massive fire breaks out in bus in kurnool andhra pradesh 20 people dead many injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 07:29 AM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Bus Fire
  • Fire Case

संबंधित बातम्या

हरियाणात एका शोरूमला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
1

हरियाणात एका शोरूमला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

कदमवाकवस्ती येथील गोडाऊनला भीषण आग; तब्बल 2 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक
2

कदमवाकवस्ती येथील गोडाऊनला भीषण आग; तब्बल 2 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.