Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone Murasu: ‘मुरासु’ चक्रीवादळाचा कहर! आंध्र प्रदेशात ११० किमी वेगाने वारे, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

Cyclone Murasu : आंध्र प्रदेशात 'मुरासु' चक्रीवादळाचा तडाखा बसला असून 110 ते 120 किमी वेगाने वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती, शेतीचे नुकसान आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 03, 2026 | 07:23 PM
Cyclone Murasu: 'मुरासु' चक्रीवादळाचा कहर! आंध्र प्रदेशात ११० किमी वेगाने वारे, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

Cyclone Murasu: 'मुरासु' चक्रीवादळाचा कहर! आंध्र प्रदेशात ११० किमी वेगाने वारे, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

Follow Us
Follow Us:
  • 110 ते 120 किमी प्रतितास वेगाने वारे
  • अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
  • मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
 

‘मुरासु’ (Cyclone Murasu) या तीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील भागांत मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी पहाटे हे चक्रीवादळ किनारपट्टीवरून पुढे सरकले. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले, तर मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. मात्र, आतापर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून पहाटे 3.30 ते 5.30 या वेळेत चक्रीवादळ पुढे सरकले. या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर होता. वाऱ्यांच्या झोतांचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचला होता.

प्रकाशम, बापटला, पलनाडू, कृष्णा, एलुरू आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली. सोमवारपासून राज्यात सरासरी 20.38 सेंटीमीटर पाऊस पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बापटला जिल्ह्यात 21 सेंटीमीटर, तर प्रकाशम जिल्ह्यात 20 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बापटला, गुंटूर आणि प्रकाशम जिल्ह्यांत बुधवार सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

समुद्राचे पाणी 50 मीटर आत घुसले

बापटला जिल्ह्यातील किनारपट्टी भागांत समुद्र खवळलेला असून उंच लाटा उसळत आहेत. सूर्यलंका समुद्रकिनाऱ्यावर जोरदार लाटांमुळे समुद्राचे पाणी सुमारे 50 मीटर आतपर्यंत घुसले.

दरम्यान, ‘अरनाब’ आणि ‘मुरासु’ या चक्रीवादळांमुळे झालेल्या पावसाने राज्यातील सरासरी पावसाची तूट 53 टक्क्यांवरून 28.9 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, पुढील काही तासांत पोलावरम, काकीनाडा, एनटीआर, कृष्णा, बापटला आणि पलनाडू जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मान्यम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कोनसीमा आणि एलुरू जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, ‘मुरासु’ चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेने सरकत असून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर ‘डीप डिप्रेशन’ अर्थात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. मंगळवारी किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि लगतच्या तेलंगणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारीही किनारी आंध्र प्रदेश आणि यानममध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather: कुठे मुसळधार, तर कुठे थेंबही नाही! महाराष्ट्रातील पावसाचे आकडे सांगतात भविष्यातील संकट

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सचिवालयातील ‘रिअल टाइम गव्हर्नन्स सोसायटी’च्या केंद्रातून चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. विविध भागांतील पाऊस आणि वाऱ्यांचा वेग याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नागरिकांना सातत्याने सतर्क ठेवल्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तमिळनाडू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदत व पुनर्वसनाच्या कामांसाठी सहकार्य मागितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण करून परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करावा, असे निर्देश नायडू यांनी दिले. प्रत्येक स्तरावर आकडेवारीच्या आधारे निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Ram Mandir donation scam : राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका निकाली; काय म्हटले न्यायालयाने?

भूजल पातळीत 45 सेंटीमीटरने वाढ

गेल्या 24 तासांत राज्यातील पावसाची तूट दोन टक्क्यांनी कमी झाली असून पुढील पाच दिवसांत आणखी दोन टक्क्यांनी घट होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकाच दिवसात भूजल पातळीत 0.45 मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे भूजल साठ्यात 20 ते 30 टीएमसी पाण्याची भर पडू शकते, असा अंदाज आहे. तलाव आणि लहान सिंचन टाक्यांमध्ये 10 टीएमसीपर्यंत पाणी जमा होण्याची शक्यता असून जलाशयांमध्ये आतापर्यंत सात ते आठ टीएमसी पाणी जमा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'मुरासु' चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम कोणत्या भागांत झाला?

    Ans: आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील नेल्लोर, बापटला आणि प्रकाशम परिसरासह अनेक जिल्ह्यांत चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला.

  • Que: चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्यांचा वेग किती होता?

    Ans: वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर होता. झोतांचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचला.

  • Que: कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे?

    Ans: पोलावरम, काकीनाडा, एनटीआर, कृष्णा, बापटला आणि पलनाडू जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Cyclone murasu andhra pradesh heavy rainfall rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Chandrababu Naidu
  • Cyclone

संबंधित बातम्या

Ram Gopal Varma : ‘त्या’ हिंसक हल्ल्यानंतर ‘ॲनिमल’ चित्रपटाची चर्चा; राम गोपाल वर्मा म्हणाले, चित्रपटांना दोष कशाला?
1

Ram Gopal Varma : ‘त्या’ हिंसक हल्ल्यानंतर ‘ॲनिमल’ चित्रपटाची चर्चा; राम गोपाल वर्मा म्हणाले, चित्रपटांना दोष कशाला?

Andhra Pradesh Viral Video : गावाला रस्ताच नाही! प्रसूतीवेदनांनी त्रस्त महिलेला ग्रामस्थांनी उचलले, व्हिडिओ चर्चेत
2

Andhra Pradesh Viral Video : गावाला रस्ताच नाही! प्रसूतीवेदनांनी त्रस्त महिलेला ग्रामस्थांनी उचलले, व्हिडिओ चर्चेत

आंध्र प्रदेशात ‘अर्णब’चा तडाखा; लाखोंना फटका, किनारपट्टीवरही मोठे नुकसान
3

आंध्र प्रदेशात ‘अर्णब’चा तडाखा; लाखोंना फटका, किनारपट्टीवरही मोठे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.