Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूरमधील रुग्णालयाच्या ICU विभागात भीषण आग; अनेक रुग्णांचा मृत्यू

आयसीयूमध्ये 15 खाटा होत्या. आगीनंतर परिसरात धुराचे लोट पसरले, ज्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. सध्या 10 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला, आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागली असावी असा संशय आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2026 | 09:39 AM
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूरमधील रुग्णालयाच्या ICU विभागात भीषण आग; अनेक रुग्णांचा मृत्यू

Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूरमधील रुग्णालयाच्या ICU विभागात भीषण आग; अनेक रुग्णांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. गुरुवारी (दि.४) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. मुझफ्फरपूरच्या सर्वात मोठ्या प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ही आग लागल्याची माहिती दिली जात आहे. या भीषण आगीत 10 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये 15 खाटा होत्या. आगीनंतर परिसरात धुराचे लोट पसरले, ज्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. सध्या 10 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला, आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागली असावी असा संशय आहे. माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आत अडकलेल्या रुग्णांना इतरांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. बाहेर काढलेल्या अनेक व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

पाळण्यात बसून ज्येष्ठाचा लोकल प्रवास ! राखीव जागा असूनही आसन मिळेना; रेल्वेच्या गर्दीचे भीषण वास्तव चव्हाट्यावर

दरम्यान, अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला पहाटे ३:५५ च्या सुमारास प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. सहा अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. तर काहींना वाचवण्यात यश आले.

रुग्णालय प्रशासनाने काय म्हटले?

आयसीयूमध्ये रुग्णांसाठी १३ खाटा होत्या आणि आणखी दोन खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आतमध्ये 13 निश्चित रुग्ण दाखल होते आणि आणखी दोन रुग्ण असण्याची शक्यता आहे. तिथे ऑक्सिजन मशीन आणि हार्ट मॉनिटरसह अनेक उपकरणे आहेत. यापैकी एका युनिटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी असा संशय आहे. धूर पसरल्याने रुग्णांची प्रकृती अधिकच खालावली. बचावकार्य पूर्ण झाले असून, परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. आयसीयूमधील रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना इतर रुग्णालयांमधील आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.

गौर ग्रीन सोसायटीत भीषण आग

दुसरीकडे, दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील उच्चभ्रू परिसर असलेल्या गौर ग्रीन ॲव्हेन्यू सोसायटीमध्ये बुधवारी (दि.29) सकाळी एका उंच इमारतीच्या आठव्या मजल्यावरून आगीच्या ज्वाला उसळल्याने घबराट पसरली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग इतकी भीषण होती की, काही मिनिटांतच आगीने नववा, दहावा आणि अकरावा मजला व्यापला. धुराचे दाट लोट अनेक किलोमीटर दूरवरून दिसत होते.

Web Title: Massive fire in the icu ward of a hospital in muzaffarpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Fire Case

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पिटलच्या NICU मध्ये भीषण आग; 9 नवजात बालकांसह…
1

छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पिटलच्या NICU मध्ये भीषण आग; 9 नवजात बालकांसह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.