Almatti Dam: अलमट्टी धरणाच्या उंचीचा निर्णय राजधानीत होणार? महाराष्ट्रातून कर्नाटकच्या निर्णयाला विरोध वाढला
कोल्हापूर: अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर पर्यंत वाढवण्यासाठी तसेच कर्नाटकच्या हिश्याची पाणी वापरण्याकरिता राज्य सरकार वचनबद्ध आहे. याबाबत बुधवारी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार असणार आहे. दरम्यान या बैठकीत महाराष्ट्र शासन कोणती भूमिका घेणार याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
केंद्र सरकारने २०१० च्या कृष्णा जलतंटा लवादाच्या निकालानुसार राजपत्र अधिसूचना यासाठी जारी करणे आवश्यक आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने यासंदर्भात दिनांक ७ में रोजी चार राज्य सरकारच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संबंधितांची मते जाणून घेण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारने उंची वाढवण्यासाठी कायदे तज्ञाची चर्चा केली आहे असे त्यांनी मत व्यक्त केले आहे ,या आधारे होणाऱ्या बैठकीत आपली भूमिका कर्नाटकचे प्रतिनिधी मांडणार आहेत.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने यापूर्वी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे .त्यासाठी आवश्यक तो निधी तरतूद केली जाईल आंध्र आणि तेलंगणा किती नफा तोटा झाला तरी धरणाची उंची आम्ही वाढवणारच अशी भूमिका कर्नाटकची आहे. एका बाजूला कर्नाटक सरकार धरणाच्या उंचीबाबत आग्रही भूमिका घेत असताना महाराष्ट्र शासन काय करणार ते अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या असलेल्या ५१९ मीटरच्या उंचीमुळे कोल्हापूर ,सांगली जिल्ह्यांना महापुराच्या काळात मोठा फटका बसतो. धरणाची उंची वाढल्यास अनेक पटीने धोका वाढणार आहे त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्र शासनाने आपली महत्त्वपूर्ण भूमिका मांडणे आवश्यक आहे.
आलमट्टी धरणाच्या ऊंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध वाढला
कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे हालचाली सुरू केल्याने शिरोळ तालुक्यावर महापुराचे मोठे संकट उभे ठाकले आहे. जर ही उंची वाढण्यास केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली, तर दरवर्षी पावसाळ्यात शिरोळ तालुक्यातील गावांना महापुराचा सामना करावा लागेल. त्यामुळे भविष्यात धरणग्रस्त होण्याची वेळ आपल्या गावांवर येऊ नये, यासाठी वेळीच सावध होऊन आलमट्टीच्या उंचीवाढीला विरोध करणाऱ्या हरकती दाखल करा, असे आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केले.
अलमट्टी धरणाच्या ऊंचीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ अत्यंत महत्वाचा निर्णयसांगली दोन जिल्ह्याच्या मुळावर उठलेल्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या धरणाची उंची भविष्यात वाढणार नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना दिली.
Almatti Dam: “भविष्यात धरणग्रस्त होण्याची वेळ…”; आलमट्टी धरणाच्या ऊंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध वाढला
पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात महापूरची स्थिति निर्माण होते. त्याला कर्नाटक सरकार जबाबदार आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसतो. सध्या या धरणाची ऊंची ५१९ मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.