अलमट्टी धरणाच्या ऊंचीला विरोध वाढला (फोटो- istockphoto)
या महिना अखेरीस केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.या बैठकीपूर्वी हरकती दाखल करून विरोध दर्शवणे गरजेचे आहे, तरी ग्रामस्थांनी रजिस्टर पोस्टद्वारे हरकती दाखल कराव्यात. यावेळी आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील,सरपंच सारिका कदम,अमित कदम, हैदर मोकाशी, रशीद मुल्ला, रामगोड पाटील, गणेश पाखरे, मियाखान मोकाशी, जहांगीर सनदी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेचा मुद्दा बनला होता. १२३ टीएमसी क्षमता असलेले अलमट्टी धरण हे कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला जबाबदार असल्याच्या तक्रारी साखरपट्ट्यातील शेतकऱ्यांनी केल्या होत्या. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही सरकारं आमने-सामने आले होते. अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढवण्याचं कर्नाटक सरकारचं नियोजन केले होते. धरणातील पाणीसाठा आणखीन वाढणार असून सिंचन आणि इतर क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे.